डोंबिवली/प्रतिनिधी – डोंबिवली पूर्व स्टेशन जवळील लक्ष्मी निवास इमारतीला दुसऱ्या मजल्यावरील एका गोडाऊनला दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास आग लागली होती .गोडावून मध्ये प्लास्टिक चे साहित्य असल्याने आगीने काही क्षणातच रौद्ररूप धारण केले . आगीमुळे परिसरात काळ धुराचे लोट पसरले होते .ऐन दुपारच्या वेळेस रहदारीच्या रस्त्यावर घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच भीतीचे वातावरण पसरले होते घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाच्या दोन गाड्या तत्काळ घटनास्थळी दाखल झाल्या आग विजवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले तासाभरात आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन विभागाला यश आले दरम्यान लक्ष्मी निवासी इमारत पालिकेने धोकादायक म्हणून घोषित केली होती या इमारतीमध्ये काही दुकानं सुरू होती तर दुसरा मजल्यावर काही दुकानदारांनी ,फेरीवाल्यानी आपला माल ठेवला होता याच मालाला आग लागली मात्र आगीच कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही
- July 15, 2021