नेशन न्यूज मराठी नेटवर्क.
पणजी/प्रतिनिधी – गोव्यात मोपा येथे नव्याने विकसित करण्यात आलेल्या मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिचालनाला आजपासून सुरुवात झाली. विमानतळ परिसरात आयोजित कार्यक्रमादरम्यान मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर पहिल्या प्रवासी विमानाचे आगमन तसेच उड्डाण झाले. केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री जनरल (निवृत्त)व्ही. के. सिंह आजच्या उद्घाटन सोहोळ्यात आभासी पद्धतीने सहभागी झाले.केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग तसेच पर्यटन राज्य मंत्री श्रीपाद नाईक आणि गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत या वेळी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 11 डिसेंबर 2022 रोजी गोवा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन केले.
आजच्या कार्यक्रमातील उपस्थितांना आभासी पद्धतीने संबोधित करताना केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री जनरल (निवृत्त)व्ही. के. सिंग यांनी मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे कार्य यशस्वीपणे सुरु करण्यात सहभागी असलेल्या सर्व भागधारकांचे अभिनंदन केले.गोवा राज्य तसेच देशाच्याही आर्थिक विकासाला चालना देण्यात हे नवे विमानतळ अनेक प्रकारे अत्यंत उपयुक्त ठरेल याचा विशेष उल्लेख देखील त्यांनी केला.
केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग तसेच पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक उपस्थितांशी संवाद साधताना म्हणाले, “गोवा राज्यासाठी, गोव्यातील लोकांसाठी आणि माझ्यासाठी देखील आज सुवर्णदिन आहे.” संसद सदस्य म्हणून पहिल्या कार्यकाळात, तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली, हवाई वाहतूक मंत्रालयाच्या कार्यात सहभागी होण्याची संधी आपल्याला मिळाली होती याबद्दलच्या स्मृतींना त्यांनी उजाळा दिला. “त्यावेळी मनोहर पर्रिकर गोव्याचे मुख्यमंत्री होते आणि आम्ही एकत्रितपणे या विमानतळाच्या उभारणीचे कार्य सुरु केले. आज आमची सर्व स्वप्ने पूर्ण झाली आहेत,” केंद्रीय मंत्री म्हणाले.
श्रीपाद नाईक पुढे म्हणाले की, या नव्या विमानतळामुळे या भागातील पर्यटन क्षेत्राला मदत होईल तसेच गोव्याला फळे, भाजीपाला आणि मासे यांसारख्या नाशिवंत वस्तूंच्या निर्यातीचे मोठे केंद्र म्हणून स्थापित करणे शक्य होईल. यातून नव्या रोजगार संधी निर्माण होतील, स्थानिकांच्या उत्पन्नात वाढ होईल आणि देशभरातील पर्यटक या भागाकडे आकर्षित होतील. केंद्र सरकार गोव्याच्या विकासावर अधिक लक्ष केंद्रित करत असून नजीकच्या भविष्यात असेच आणखी काही प्रकल्प यथे उभारले जातील असे त्यांनी सांगितले.
गोवा हे पारंपरिकरित्या अत्यंत लोकप्रिय पर्यटन केंद्र आहे, मात्र दाबोलीम विमानतळ हे संरक्षण विभागाचे विमानतळ असल्यामुळे येथील हवाई वाहतुकीला मर्यादा आहेत असे मत गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केले. या नव्या विमानतळाच्या माध्यमातून आता गोवा नव्या 18 परदेशी ठिकाणांशी तर 30 देशांतर्गत नवीन ठिकाणांशी थेट जोडले जाणार आहे अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
ते पुढे म्हणाले की, गोव्यामध्ये फिरणाऱ्या पर्यटकांसाठी हळूहळू नियमित स्वरूपातील टॅक्सी सेवा उपलब्ध होत असून, तोपर्यंत, राज्य सरकार पर्यटकांच्या सोयीसाठी कदंबा वाहतूक महामंडळाच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक बसचा ताफा उपलब्ध करून देत आहे. विमानतळावरून संचालित केल्या जाणाऱ्या प्रवासी आणि मालवाहतूक सेवांमुळे, आता गोवा या उपखंडातील सर्वात आकर्षक पर्यटनस्थळ म्हणून नावारूपाला येईल असे ते म्हणाले. विमानांच्या इंधनावरील मूल्यवर्धित करात नुकतीच 18% वरुन 8% अशी कपात करून राज्य प्रशासनाने अत्यंत सकारात्मक पाऊल उचलले आहे अशी टिप्पणी त्यांनी केली. पर्यटन, मालवाहतूक, हवाई प्रवास आणि संबंधित क्षेत्रांमध्ये गोवा राज्याला प्रचंड यश मिळवून देण्याच्या उद्देशाने राज्य सरकार सर्व संबंधित भागधारकांना मनःपूर्वक पाठींबा देण्याप्रती समर्पित आहे अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिचालनाला आजपासून सुरुवात झाल्याबद्दल केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया यांनी ट्विटर संदेशाद्वारे आनंद व्यक्त केला आहे.विमानतळाचे कार्य सुरु होणे तसेच विमानाच्या इंधनाच्या मूल्यवर्धित कराचे सुसूत्रीकरण या दोन्ही घडामोडी भारताचे प्रवेशद्वार या रुपात गोव्याचे धोरणात्मक महत्त्व वृद्धींगत करतील आणि गोवा राज्यासाठी पर्यटनाची तसेच रोजगाराची नवी द्वारे उघडून देतील अशी आशा सिंदिया यांनी त्यांच्या ट्विट संदेशात व्यक्त केली आहे.
माजी संरक्षणमंत्री तसेच गोव्याचे मुख्यमंत्रीपद चार वेळा भूषविणारे मनोहर पर्रिकर यांना श्रद्धांजली म्हणून गोव्यातील मोपा येथे उभारण्यात आलेल्या ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय विमानतळाचे ‘मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ – मोपा, गोवा’ असे नामकरण करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी पूर्व लक्षी प्रभावाने मंजुरी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोव्हेंबर 2016 मध्ये या आंतरराष्ट्रीय विमानतळाची पायाभरणी केली होती. सुमारे 2,870 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेला हा विमानतळ शाश्वत पायाभूत सुविधांच्या मध्यवर्ती संकल्पनेवर बांधण्यात आला आहे आणि त्यात सौर उर्जा संयंत्रे, पर्यावरण स्नेही इमारती, धावपट्टीवर एलईडी दिवे, पर्जन्य जल संधारण, पुनर्वापर प्रक्रियेच्या व्यवस्थेसह अत्याधुनिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र यांसह इतर अनेक सुविधांचा समावेश आहे.
सुरुवातीला, पहिल्या टप्प्यात या विमानतळावर दर वर्षी अंदाजे 4.4 दशलक्ष प्रवासी प्रवास करू शकतील आणि या क्षमतेमध्ये टप्प्याटप्प्याने वाढ करून वार्षिक 33 दशलक्ष प्रवासी क्षमतेपर्यंत त्याचा विस्तार केला जाईल. या विमानतळाच्या बांधकामात गोव्याचे स्थानिक वैशिष्ट्य असलेल्या अझुलेजोस टाईल्सचा वापर करण्यात आला आहे. येथील फूड कोर्टमध्ये गोव्याचे खास वैशिष्ट्य असलेल्या कॅफेची निर्मिती करण्यात आली आहे. या विमानतळावर क्युरेटेड स्वस्त बाजारपेठेसाठी विशेष जागा ठेवण्यात आली आहे जिथे स्थानिक कारागीर आणि हस्तकलाकार त्यांच्या कलाकुसरीच्या वस्तू प्रदर्शित करू शकतील आणि त्यांची विक्री देखील करू शकतील.
Related Posts
-
आंतरराष्ट्रीय युवा दिना’निमित्त विशेष पोस्ट कार्ड
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. पणजी - "आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त, विशेष…
-
आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेत भारताची विजयी पताका
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - स्वित्झर्लंडमध्ये झ्युरिक येथे 16…
-
भिवंडी येथील वलपाडा परिसरात कोसळली इमारत,अनेक लोक ढिगाऱ्याखाली
नेशन न्यूज मराठी टीम. भिवंडी/प्रतिनिधी - भिवंडी येथील वलपाडा परिसरातील…
-
आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाचे बोधचिन्ह ठरविण्यासाठी स्पर्धा
मुंबई, दि. 29 : राज्यात नव्याने स्थापन करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाचे…
-
शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाने ओलांडला १० लाख प्रवाशांचा विक्रमी टप्पा
नेशन न्युज मराठी टीम. शिर्डी - चार वर्षांपूर्वी सुरु झालेल्या शिर्डी आंतरराष्ट्रीय…
-
ग्रामीण भागातील तरुणीची फॅशन जगतातील आंतरराष्ट्रीय भरारी
नेशन न्यूज मराठी टीम. सोलापूर- सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातून एका…
-
नेहरू युवा केंद्राकडून मुंबई ते गोवा पदयात्रा
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी- नेहरू युवा केंद्राकडून 1 एप्रिल ते 31 मे 2023 या कालावधीत…
-
आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा विद्यापीठ विधेयक मंजूर
प्रतिनिधी. मुंबई - आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ महाराष्ट्र 2020 च्या विधेयकास…
-
आंतरराष्ट्रीय घरकामगार दिनानिमित्त घरकामगार महिलांची जन संवाद सभा
कल्याण/प्रतिनिधी - १६ जून आंतरराष्ट्रीय घरकामगार दिनानिमित्त घरकामगार महिलांची जन…
-
कल्याण उंबर्डे येथील कचरा प्रकल्पाला आग
कल्याण/प्रतिनिधी - कल्याणातील वाडेघर येथील डम्पिंग ग्राऊंडला आग लागण्याचे प्रकार होत…
-
इलेक्ट्रीक वाहन आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात नवी मुंबई महानगरपालिकेचा सहभाग
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी - वर्ल्ड मिडिया ॲण्ड…
-
कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक जयस्तंभास उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिवादन
प्रतिनिधी. पुणे - कोरेगाव भीमा येथील जयस्तंभास अभिवादन करुन त्या ऐतिहासिक…
-
आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात उद्या ‘महाराष्ट्र दिन’
नवी दिल्ली/प्रतिनिधी - महाराष्ट्राची लोककला ही समृद्ध अशी आहे. उद्या…
-
आंतरराष्ट्रीय रोबोटिक स्पर्धेत मुंबईतील ५ विद्यार्थ्यांचा सहभाग
नेशन न्युज मराठी टिम. मुंबई/प्रतिनिधी - जिनेव्हा (स्वित्झर्लंड) येथे येत्या…
-
फेक आंतरराष्ट्रीय फोन कॉल ब्लॉक करण्यासाठी सरकारने दिले निर्देश
नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारतीय मोबाईल क्रमांक दिसेल अशा प्रकारे भ्रष्ट…
-
आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा
नेशन न्यूज मराठी टीम. गोवा/प्रतिनिधी - दरवर्षी सप्टेंबरच्या तिसर्या आठवड्यात…
-
उंबर्डे येथील रस्ता रुंदीकरणातील ७० बांधकामावर केडीएमसीचा हातोडा
कल्याण : कल्याण पश्चिमेतील कै. आत्माराम भोईर चौक (तलाठीऑफिस) ते नेटक-या…
-
क्रिडा प्रेमीना खुश खबर, आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाच्या अभ्यासक्रमास लवकरच सुरूवात
नवी दिल्ली/प्रतिनिधी - पुण्यातील बालेवाडी येथील आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाच्या अभ्यासक्रमास…
-
कल्याणात साकारला प्रतिकात्मक दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळाचा देखावा
प्रतिनिधी/संघर्ष गांगुर्डे - नवी मुंबई विमानतळाला दि बा पाटील यांचे…
-
वंचित बहुजन आघाडीचा महाड येथील पूरग्रस्तांना मदतीचा हात
कल्याण/संघर्ष गांगुर्डे -वंचित बहुजन आघाडी चे सर्वेसर्वा आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या…
-
आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्ताने ठाणे मिलेट महोत्सव
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष…
-
आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यात महाराष्ट्र दालनाला पुरस्कार
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - यंदाच्या 41 व्या…
-
डोंबिवली येथील कोपर पूल गणेशोत्सवापूर्वी सुरु होण्याचे संकेत
डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - डोंबिवली येथील कोपर पूल गेल्या दोन वर्षापासून…
-
आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाच्या प्रक्रियेला वेग,ऑक्टोबरपासून प्रवेश प्रक्रिया
मुंबई/प्रतिनिधी - देशात प्रथमच आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाची मुहूर्तमेढ महाराष्ट्रातून होत असून…
-
आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू सोनालीला महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार जाहीर
नेशन न्यूज मराठी टीम. बीड/प्रतिनिधी - बीडच्या मंगरूळ गावातील आंतरराष्ट्रीय…
-
ताश्कंद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात भारतीय प्रतिनिधी मंडळ सहभागी
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी -15व्या ताश्कंद आंतरराष्ट्रीय चित्रपट…
-
मुंबईत सप्टेंबर २०२३ मध्ये आंतरराष्ट्रीय महिला धोरणाबाबत परिषदेचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - भारत आणि मेक्सिकोच्या पुढाकाराने…
-
बायोमिमिक्रीवर विद्यापीठातर्फे आंतरराष्ट्रीय वेबिनार संपन्न
प्रतिनिधी. सोलापूर - पशु-पक्ष्यांपासून निसर्गाची हालचाल सुरू झाली. प्राण्यांच्या नक्कलपासून…
-
महाराष्ट्र टपाल विभागाकडून आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशेष लिफाफा जारी
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - आठव्या आंतरराष्ट्रीय योग दिन…
-
केमिस्ट्री ऑफ सिमेंटवरील आंतरराष्ट्रीय परिषदेचे यजमानपद भारताकडे
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - इंटरनॅशनल…
-
लालचौकी येथील सिग्नल वाहनचालकांसाठी ठरतोय डोकेदुखी
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - लालचौकी येथील सिग्नल वाहनचालकांसाठी त्रासदायक ठरत असून सिग्नल…
-
महाराष्ट्रात देशातील पहिले आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ
प्रतिनिधी. मुंबई - महाराष्ट्रामध्ये विकासाच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकण्यासाठी…
-
पुण्यात आंतरराष्ट्रीय युवा आणि शाश्वतता महोत्सव २३ सुरू
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे/प्रतिनिधी - सिम्बायोसिस इंटरनॅशनलने आयोजित केलेला…
-
दिव्यांगाबाबत जनजागृतीसाठी कल्याण ते गोवा सायकल प्रवास
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - अपघातात हातपाय गमवणाऱ्या किंवा जन्मापासूनच दिव्यांग असणाऱ्या…
-
मंत्री आदित्य ठाकरे यांची वरळी येथील लसीकरण शिबिरांना भेट
मुंबई/प्रतिनिधी - वरळी कोळीवाडा येथील कोळी भवनमध्ये आयोजित कोविड लसीकरण…
-
उद्घाटनाची औपचारिकता टाळून माणकोली येथील उड्डाणपुल सुरू करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
प्रतिनिधी. मुंबई - उद्घाटनाची अधिकृत वाट न पाहता माणकोली उड्डाणपुलावरून वाहतूक…
-
कल्याण येथील लोकन्यायालयात १९५१ प्रकरणे निकाली
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - शनिवारी कल्याण तालुका विधी सेवा समितीतर्फे राष्ट्रीय लोकन्यायालयाचे…
-
मनोहर जोशी यांचं शिक्षक म्हणून कार्य मोठं आहे - बाळासाहेब आंबेडकर
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. अकोला/प्रतिनिधी - शिवसेनेतील पहिल्या फळीतील…
-
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आंतरराष्ट्रीय चर्चा सत्राचे आयोजन
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त बिर्ला महाविदयालयातर्फे आंतरराष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन…
-
भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाच्या गोवा संग्रहालयात आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन साजरा
नेशन न्युज मराठी नेटवर्क. गोवा - भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाच्या अखत्यारितील…
-
गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये इंडियन ऑटो शो
मुंबई प्रतिनिधी - पर्यावरणाचे नुकसान होणार नाही अशा इलेक्ट्रिक वाहनांना…
-
आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात ‘महाराष्ट्र दिन’ उत्साहात साजरा
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - राजधानीत सुरु असलेल्या भारत…
-
पांढरी खानापूर येथील प्रवेशद्वाराच्या नावासाठी तीन दिवसांपासून आंदोलन सुरूच
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. अमरावती/प्रतिनिधी - अमरावती जिल्ह्याच्या अंजनगाव…
-
मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सांगता
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - राज्यपाल भगत सिंह कोश्यारी…
-
आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राला मानाचा पुरस्कार
मुंबई/प्रतिनिधी - पर्यावरण संवर्धनाच्या महाराष्ट्राच्या प्रयत्नांची संयुक्त राष्ट्र हवामान बदल…
-
सांस्कृतिक मंत्रालयाकडून ‘जगदीशचंद्र बोस–सत्याग्रही वैज्ञानिक’ यांच्या योगदानाविषयक आंतरराष्ट्रीय परिषद
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. सुप्रसिद्ध भारतीय वैज्ञानिक आचार्य जगदीशचंद्र बोस यांची 164 वी जयंती आणि भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचे औचित्य साधून विज्ञान भारती आणि केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने ‘जगदीशद्र बोस सत्याग्रही वैज्ञानिकाचे योगदान’ या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित केली होती इंद्रप्रस्थ विज्ञान भारती आणि नवी दिल्लीतील आंतरविद्यापीठ त्वरक केंद्राच्या सहयोगाने ही परिषद झाली.आचार्य जगदीशचंद्र बोस यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात संशोधन करून विज्ञानात दिलेले योगदान आणि स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होऊन दिलेल्या योगदानाविषयी नव्या पिढीला माहिती व्हावी, असा हेतू या परिषदेच्या आयोजनामागे होता. बोस यांनी बिनतारी रेडिओची निर्मिती केली व त्याबद्दल इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकी संस्थेने त्यांचा ‘रेडिओ विज्ञानाचे जनक’ म्हणून गौरव केला.
-
भारतीय स्पर्धा आयोगाच्या वतीने ब्रिक्स आंतरराष्ट्रीय स्पर्धा परिषदेचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारतीय स्पर्धा आयोग…
-
मुंबई-गोवा महामार्गावर ट्रक जळून खाक
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. रत्नागिरी/प्रतिनिधी - मुंबई-गोवा महामार्गावर सकाळच्या…
-
गोवा ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे यजमानपद भूषवणार
नेशन न्यूज मराठी टीम. पणजी/प्रतिनिधी - विक्रमी 43क्रीडा प्रकारांचा समावेश…