महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
ताज्या घडामोडी

उपलब्ध रोजगारामध्ये भूमिपुत्रांना प्राधान्य द्या व परप्रांतात गेलेल्या मजुरांची वैद्यकीय तपासणी करूनच राज्यात घ्या – मनसे आमदार राजू पाटील

प्रतिनिधी .

कल्याण :  सत्तेतील काही खासदार परप्रांतीयांचे लांगुलचालन करून जाणीवपूर्वक भूमिपुत्रांचे खच्चीकरण करीत असल्याचा आरोप मनसे आमदार राजू पाटील यांनी केला आहे .तसेच राज्यात  उपलब्ध असलेल्या रोजगारांमध्ये भूमिपुत्रांना प्राधान्य देऊन, लॉकडाऊन काळात परप्रांतात गेलेल्या मजुरांची ‘आंतरराज्यीयस्थलांतर कायद्यानुसार नोंदणी करून वैद्यकीय तपासणी करूनच राज्यात परत घेन्याची मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे .

     मनसे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्र्यांनानिवेदन पाठवले असून या निवेदनात त्यांनी राज ठाकरे यांनी  परप्रांतीय पुन्हा महाराष्ट्रात येतील तेव्हा त्यांची आंतरराज्यीय स्थलांतर कायद्यानुसार नोंदणी करन्याची आग्रही भूमिका मांडली होती. परंतु याकडे दुर्लक्षकरून सरकार अशी कोणतीही नोंदणी न करता परप्रांतीयांना पायघड्या घालत असून  महाराष्ट्रातील भूमिपुत्रांच्या रोजगाराबाबत काहीही देणं घेणं नसल्याचा आरोप केला आहे .एकीकडे परप्रांतीयांना त्यांच्या राज्यात जाण्यासाठी ट्रेन,बसची मोफत व्यवस्था करण्यात आली तर विविध भागात अडकून पडलेल्या राज्यातीलनागरिकांना त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी इ -पास,फिटनेस सर्टिफिकेट घेऊन चेकपोस्ट वर 12-12 तास थांबून जावे लागल्याची खंत पाटील यांनी व्यक्त केली

 या भूमिपुत्रांना पुन्हा रोजगारासाठी शहरात आणण्यासाठी सरकार किंवा उद्योजक आताही प्रयत्न करताना दिसत नाहीत, हॉटस्पॉट असलेल्या भागामध्ये थर्मल चेकिंग आणि स्क्रीनींग होत नाही तर दुसरीकडे सरास परप्रांतीय येत आहेत त्यांचे सर्वांचे स्क्रीनींग आणि थर्मल चेकिंग करीत असल्याचार म्हणत असल्याचा खुलासा पाटील यांनी केला .भूमीपुत्राचे होणारे हाल लक्षात घेता या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सर्व उद्योगांमध्ये 80 टक्के भूमिपुत्रांना नोकरी देणे बंधनकारक करून त्याची तातडीने अंमलबजावणी करून दुर्लक्ष करणाऱ्या उद्योजकांवर कठोर कारवाई करावी तसेच परप्रांतीय मजूर मुंबईत परतताना त्यांची ‘आंतरराज्यीय स्थलांतर कायधा’नुसार नोंदणी करत  वैद्यकीय तपासणी करावी अशी मागणी केली आहे .

Translate »
×