प्रतिनिधी.
डोंबिवली – कल्याण डोंबिवली करांच्या पुलकोंडीमुळे झाल्यामुळे नागरिकांना प्रचंड वाहतूक कोंडीला समोरे जावे लागत आहे. त्यामध्ये कल्याण मधील पत्रीपुल,दुर्गाडी पूल डोंबिवली मधील कोपरपूल आणि माणकोली पूल यांची कामे अत्यंत कासवगतीने सुरू आहेत. तर नवीन पलावा पुलाचे फक्त पिलर बांधून सोडून दिले आहे.त्यामुळे पुलकोडी झाली असून ट्रॅफिक जाम होत आहे. त्यामुळे नागरिकांना दिलेल्या आश्वासनांचा पुरता बोजवारा उडाला आहे.तर सतत सत्ताधारी नवीन नवीन तारखा देत आहेत. पूला बाबत डोंबिवली मध्ये मनसेचे आमदार राजू पाटील यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता आमदार यांनी पत्रीपुल आणि माणकोली पुलाला हेरिटेजचा दर्जा द्या असा टोला सत्ताधाऱ्याना लगावला..
Related Posts