महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
Default Image चर्चेची बातमी शिक्षण

केडीएमसीच्या शाळेत विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण द्या- वंचितची मागणी

नेशन न्यूज मराठी टीम.

कल्याण/प्रतिनिधी – आजचे विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहेत. त्यांना जर योग्य पद्धतीचे आधुनिक शिक्षण मिळाले तर ते देशाचे नाव उज्वल करू शकतात. आजच्या युगात आधुनिक शिक्षण घेण हे सामन्याच्या खिशाला न परवडणारे झाले आहे. सामान्य कुटुंबातील गोरगरीब विद्यार्थ्याना इंग्रजी माध्यमांचे शिक्षण महापालिका शाळेतून मिळाले तर अनेक गरीब कुटुंबातील हुशार विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होऊ शकतो त्याच प्रमाणे मध्यमवर्गीय व गोरगरीब मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी तसेच विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी महानगरपालिकेच्या प्राथमिक ते माध्यमिक शाळांमधून इंग्रजी माध्यमाचे शिक्षण द्या या मागणीसाठी डोंबिवली विभागीय कार्यालयावर वंचित बहुजन आघाडीवतीने धरणे आंदोलन करण्यात आले. दरम्यान या विषयावरील निवेदन उपायुक्त स्वाती देशपांडे यांना देण्यात आले.

इंग्रजीत शिक्षण पहिल्या वर्गापासून देणे अपेक्षीत आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात मध्यमवर्गीय गरीब कुटुंबाची संख्या लक्षणीय आहे. सध्याच्या महागाईच्या काळात इच्छा असतानाही पालक आपल्या पाल्याला पैशा अभावी चागल्या शाळेत शिक्षणासाठी प्रवेश घेऊ शकत नाही. त्यामुळे पालकांना आपल्या मुलांना खाजगी इंग्रजी माध्यमातील शाळेत शिक्षण देता येत नाही. त्या शाळेची फी सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. त्यामुळे कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाने इंग्रजी माध्यमातून शिक्षण देण्याची आजची गरज आहे. पोटभरू संस्थांनी शिक्षणाचे बाजरीकरण केले आहे, त्यामुळे ज्याच्याकडे पैसे आहेत तेच विद्यार्थी शिक्षण घेऊ शकतात. गोरगरीब विद्यार्थ्यांनी जायचे कुठे? असा सवाल करत इंग्रजी आधुनिक शिक्षणाचे मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीन सर्व कार्यकर्त्यांनी केली.

त्याच बरोबर ते म्हणाले कि आपल्या महाराष्ट्रात राष्ट्रपिता महात्मा ज्योतीबा फुले, छत्रपती शाहू महाराज, संत गाडगे महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वांना समान शिक्षण मिळावे या भेदभाव केला जाऊ नये यासाठी स्वत:चे सर्वकाही पणाला लावले. महापुरुषाच्या राज्यात सर्वांना समान शिक्षण मिळावे, आधुनिक शिक्षण हा सर्वसामान्याचा अधिकार आहे. यासाठी पालिकेने प्राथमिक व माध्यमिक इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरु कराव्यात.यावेळी राजू काकडे, बाजीराव माने, संतोष धुळे, अर्जुन केदार, राहुल जाधव, ऍड: मिलींद साळवे, अशोक गायकवाड, अमोल हिवराळ, दीपक भालेराव, सुरेंद्र ठोके, वैजनाथ कावळ, राहुल चिलवंत यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×