नेशन न्युज मराठी टीम.
चाळीसगाव/प्रतिनिधी– महाराष्ट्राच्या अनेक भागात पावसाने धुमाकूळ घातला आहे अनेक जिल्हात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरु आहे चाळीसगावच्या धरण क्षेत्रात पावसाने दमदार हजेरी लावली आहे.
त्यामुळे शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या व जिल्ह्याची तहान भागविणारे गिरणा धरण आज सकाळी ८ वाजता पूर्ण क्षमतेने भरले असून मोठ्या प्रमाणात धरणातून पाण्याचा विसर्ग होत आहे. धरणाचे सहा वक्रद्वार तीन फुटाने उघडण्यात आला आहे. त्यानुसार गिरणा नदीपात्रातून एकूण २२ हजार दोनशे ८४ क्युसेक पाण्याचा विसर्ग गिरणा नदीपात्रात सोडण्यात आला आहे. दरम्यान धरणामध्ये येणाऱ्या पाण्याची आवक बघता पाण्याचा विसर्ग कमी जास्त करण्यात येणार असून नदीकाठच्या सर्व नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनांकडून देण्यात आला आहे.