नेशन न्यूज मराठी टीम.
मुंबई / प्रतिनिधी – गणेशोत्सवाच्या आगमनाच्या प्रतीक्षेत घरगुती तसेच सार्वजनिक गणपती आरास आणि मिरवणुकीच्या तयारीला जोर आला आहे. मुंबईत अभ्युदय नगरच्या गणपती आगमनाच्या मिरवणुकीची अशीच चर्चा ऐकायला मिळते. २०१६ पासून अभुदयनगरचा राजा मुंबईत रथात बसणारा पहिला गणपती म्हणून प्रसिद्ध झाला होता. त्यादरम्यान मोराचे रथ बनवले गेले होते. गणेश चतुर्थी येण्याआधी जागतिक विषयावर संकल्पना तयार करून रथ बनवण्यात येते. त्यानंतर ही परंपरा पाळत अभुदय नगर मंडळाने दरवर्षी अनेक वेगवेगळे रूपाचे रथ बनवून बाप्पाचे आगमन करायला सुरवात केली.
यावर्षी नवीन संकल्पना म्हणून गरुड झेप असं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.या संकल्पनेचा रथ बनवण्यासाठी तब्बल १२ दिवस लागले. त्याचबरोबर गरुड झेप रत सजवण्यासाठी ३५० ते ४०० किलो वेगवेगळ्या फुलांचा वापर करण्यात आला.असं म्हणतात गरुडावर बैसूनी गणपती आला तसंच यावर्षी गरुडावर बैसूनी अभुदय नगर चा राजा आला.