नेशन न्यूज मराठी टिम.
कल्याण/संघर्ष गांगुर्डे – कल्याण डोंबिवली महापालिकेच्या बारावे घनकचरा प्रकल्पातील कचऱ्याला आज दुपारी भीषण आग लागली. ही आग इतकी मोठी आहे की केडीएमसी अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल होऊन आगेवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करत आहेत.आगीमुळे परिसरात धूर पसरला होता.धुरामुळे सगळी कडे धुराचे साम्राज्य दिसत होते.
कल्याण पश्चिमेतील बारावे गाव परिसरात केडीएमसीचा हा घन कचरा प्रकल्प आहे.येथे कचऱ्या पासून खत निर्मितीचे काम होत असते.काही दिवसापूर्वी या कचरा प्रकल्पाला भीषण आग लागण्याची घटना घडली होती. मात्र ही आग पहाटेच्या सुमारास लागली होती तर आज दुपारच्या सुमारास ही आग लागली आहे.
याठिकाणी ही आग नेमकी कशामुळे लागलीय याची माहिती मात्र समजू शकली नाही. विशेष म्हणजे याठिकाणी असणाऱ्या सुक्या कचऱ्याने काही क्षणातच रौद्ररूप धारण केले. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.कचऱ्याला वांरवांर आग का लागते हा मोठा संशोधनाचा विषय आहे.