नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण/संघर्ष गांगुर्डे – भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार विश्वरत्न बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 132 जयंती यंदा 2023 रोजी देशात विदेशात मोठ्या जल्लोषात साजरी होणार आहे. यंदाच्या बाबासाहेबांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून बहुजन समाज पक्षाने संपूर्ण राज्यातील 36 जिल्ह्यात गाव चलो अभियान प्रारंभ करणार आहे. खेड्या पाड्यातील शोषित पीडित समाजा पर्यंत एकाच वेळी पोहचण्याचा हा प्रयत्न असेल.
3 एप्रिल ते 30 एप्रिल पर्यंत राज्यातील प्रत्येक विधानसभेत म्हणजे 288 विधानसभा क्षेत्रात 48 लोकसभा क्षेत्रात प्रत्येक 132 बूथ गठीत म्हणजे 38,016 बूथ तयार करण्याचा बहुजन समज पक्षाने संकल्प निर्धार केला असून या दरम्यान 3 एप्रिल पासून संपूर्ण राज्यात एकाच वेळी गाव चलो अभियान सुरू केलं जाणार आहे. त्याची आखणी अमल बजावणी करण्यासाठी राज्याच्या चार झोन प्रभारींना तसे निर्देश पक्ष श्रेष्ठी कडून देण्यात आले आहे.
बहुजन समाज पक्षाच्या 39 व्या वर्धापन दिन आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा मायावती, पक्षाचे राष्ट्रीय समन्वयक आकाश आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचे राष्ट्रिय महासचिव खासदार डॉ अशोक सिद्धार्थ, पक्षाचे प्रदेश प्रभारी नितीन सिंग यांच्या निदर्शनखाली पक्षाचे प्रदेश अध्यक्ष ॲड. संदीप ताजने यांच्या नेतृत्वात राज्यातील चार झोन मध्ये गाव चलो संपर्क अभियान राबविण्यात येणार आहे.
याकरिता राज्यातील विदर्भ मराठवाडा विभागाचे प्रदेश प्रभारी सुनील डोंगरे, उत्तर महाराष्ट्राचे प्रदेश प्रभारी मनीष कावळे, पश्चिम महाराष्ट्राचे प्रदेश प्रभारी हुलगेश चलवादी, मुंबई कोकण विभाग प्रदेश प्रभारी प्रा. प्रशांत इंगळे यांच्या नेतृत्वात राज्यातील सर्व पक्ष महासचिव,सचिव,जिल्हा अध्यक्ष,सेक्टर बूथ अध्यक्ष, विधान सभा अध्यक्ष,पदाधिकाऱ्यांनी हे आंदोलन यशस्वी करून महामानव बाबासाहेबांची 132 वी जयंती ही वैचारिक पद्धतीने साजरी करण्याचा संकल्प बसपाने केला आहे. यावेळी वैचारिक कटिब्धतेची जयंती बाबासाहेबांची हे विचार गाव पातळीवर पोहचवण्यासाठी प्रशिक्षित बसपा केडर पदाधिकारी प्रयत्न करतील अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश सचिव सुदाम गंगावणे यांनी दिली.