नेशन न्यूज मराठी टीम.
सोलापूर/प्रतिनिधी – महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये दरोडा, जबरी चोरी, घरफोड्या घालून दहशत माजवणाऱ्या आंतरजिल्हा टोळीतील तिघांना एमआयडीसी पोलिसांनी जेरबंद केले. त्यांच्याकडून दोन किलो चांदी,एक पिस्टल,दोन दुचाकी,दोन चार चाकी असा सहा लाख १४ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चार आणि जेलरोड हद्दीतील दोन असे एकूण सहा गुन्हे उघडकीस आणले गेले आहे.
११ ऑक्टोबर रोजी पहाटे बालाजी ज्वेलर्स निलमनगर येथे चोरी केलेल्या टोळीतील राहुल रवींद्रसंग भॉड व सूरज प्रकाश चव्हाण हे पोलिस कोठडीत आहेत. पोलिसांनी सूरज चव्हाण याच्याकडे घरफोडीच्या गुन्ह्याबद्दल कसून चौकशी केली असता त्याने चोरीतील अन्य दागिने प्रेम काशिनाथ कोळी याच्याकडे असल्याचे सांगितले.लागलीच फौजदार रजपूत यांनी सूत्रे हलवली आणि त्यांनी प्रेम कोळी याला कलावतीनगर, एमआयडीसी सोलापूर येथून अटक केली. अटक केलेल्या प्रेम कोळी याला पोलिसी खाक्या दाखवून चौकशी केली असता त्याने १४ ऑक्टोबर रोजी पहाटे दरोडा टाकण्याच्या उद्देशाने विणकर वसाहत येथून चोरलेली व कोंड्याल शाळेजवळ पार्क केलेली कार घेण्यासाठी प्रेम कोळी आणि त्याच्या दोन साथीदार तिलकसिंग टाक आणि हन्सराज उर्फ हन्सुसिंग रणजितसिंग टाक कार लावली होती तेथे गेले. तेथे या आरोपींनी फौजदार रजपूत यांच्या अंगावर कार घालण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात रजपूत यांनी कार थांबवण्यासाठी टायरच्या दिशेने फायरिंग केली.