नेशन न्यूज मराठी टीम.
उल्हासनगर / प्रतिनिधी – उल्हास नगर मधील विजय लक्ष्मी ज्वेलर्स या ठिकाणी अनोळखी व्यक्तीने चोरी केली होती. दुकानात रखवालदार म्हणून काम करत असतानाच त्याच दुकानात चोरी करणाऱ्या एका टोळीला ठाणे मालमत्ता गुन्हेशाखा पोलिसांनी अटक केली आहे. त्या टोळीने एकूण तीन कोटी २० लाखांचे ६ किलो दागिने चोरी केले होते.
या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे तर इतर सात जणांचा शोध सुरु आहे. या प्रकरणात पोलिसांनी ५५ तोळे सोने हस्तगत केले आहे. सदरचा आरोपींना सीसीटिव्ही च्या माध्यमातून अटक केली आहे . १) माधव चुन्नालाल गिरी २) दिनेश उर्फ सागर चंद्र रावल ३) दीपक रामसिंग भंडारी आरोपींना अटक करण्यात आली आहे.
नमूद आरोपी हे मूळचे नेपाळला राहणारे आहेत. त्यांनी सदर गुन्हा कबुल केला आहे. सदर गुन्ह्याचा अधिक तपास गुन्हे शाखेकडून करण्यात येत आहेत. अटक करण्यात आलेले आरोपी हे अशा प्रकारचे गुन्हे करण्यास सराईत असून त्यांनी कामोठे या ठिकाणी देखील गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच त्यांच्यावर यापूर्वी मध्यप्रदेश, गुजरात, कर्नाटक येथे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.