नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
पंढरपूर/प्रतिनिधी – स्वर्गीय आमदार भारत नाना भालके यांच्या जयंतीनिमित्त पंढरपुरात भारत कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून या महोत्सवाच्या निमित्ताने कृषी आणि शेती आधारित व्यवसाय या बद्दल मोलाचे मार्गर्शन माहिती शेतकऱ्यांना उपलब्ध होत आहे.
या भारत कृषी महोत्सवात पशु पक्षी आदींचाही समावेश असून दुग्ध व्यवसायाशी निगडित माहिती देखील दिली जात आहे. या महोत्सवात दाखल झालेला दीड टन वजनाचा हिंद केसरी गजेंद्र रेडा हा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला असून बेळगाव जिल्ह्यातील कागवाड येथील शेतकरी विलास नाईक यांनी या गजेंद्र रेड्या बाबत अधिक माहिती देताना या रेड्याचे रोजचे खाद्य ४ किलो पेंड,१५ लिटर दूध,३ किलो सफरचंद,३ किलो आटा असल्याचे सांगितले. या रेड्याचा रोजच्या आहाराचा खर्च २ हजार रुपये पेक्षा जास्त असल्याचे सांगितले. या रेड्यास आता पर्यंत दीड कोटी इतकी सर्वोच मागणी आली असून हा गजेंद्र रेडा पाहण्यासाठी मोठी गर्दी होताना दिसून येत आहे.