प्रतिनिधी.
नाशिक – भारतीय निमलष्कराच्या केंद्रीय राखीव पोलीस दलात कार्यरत असलेले असिस्टंट कमांडन्ट नितीन भालेराव यांचे छत्तीसगड येथील सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात देशसेवेचे कर्तव्य बजावत असताना निधन झाले.असिस्टंट कमांडन्ट नितीन भालेराव यांच्यावर सायंकाळी नाशिक शहरातील अमरधाम येथे शोकाकुल वातावरणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. शनिवारी रात्री १० वाजेच्या सुमारास छत्तीसगड येथील सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी ताडमेटला परिसरातल्या बुरकाल येथून ६ किलोमीटर अंतरावर स्फोट घडवून आणला होता. या स्फोटात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या २०६ कोब्रा बटालियनचे सहायक कमांडन्ट नितीन भालेराव यांना वीरमरण आले होते.
नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील देवपूर या गावचे मूळ असलेले शहीद नितीन भालेराव हे नाशिक शहरातील राजीवनगर येथे वास्तव्याला होते. त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण नाशिकच्या गोखले एज्युकेशन येथे पूर्ण करून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून केंद्रीय राखीव दलात दाखल झाले होते. २०१० साली केंद्रीय राखीव पोलीस दलात भरती झालेले जवान नितीन भालेराव यांनी सर्वप्रथम जम्मू काश्मीर येथील कुलगाम येथे सेवा बजावली होती त्यानंतर पंतप्रधान कार्यालयाच्या विशेष संरक्षण टीम मध्ये त्यांनी सेवा दिली होती. त्यानंतर राजस्थानमधील माउंटअबू स्थित ‘अंतर्गत सुरक्षा अकादमी‘ येथे त्यांनी काम केले होते. जून महिन्यापासून ते २०६ कोब्रा बटालियन मध्ये सहाय्यक कमांडन्ट म्हणून कार्यरत होते.
दरम्यान, नक्षलवादी विरोधी कारवाया रोखण्यासाठी त्यांचे विशेष योगदान होतं. देशांतर्गत झालेल्या विविध लढाऊ स्पर्धेत शहीद नितीन भालेराव यांनी उत्तम कामगिरी केली होती.
अंत्यसंस्कार स्थळी पार्थिव येताच राज्य शासनाच्या वतीने अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, निमलष्करी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या वतीने महानिरीक्षक संजय लाटकर, नाशिक पोलीस आयुक्तालयातर्फे पोलीस आयुक्त दीपक पांडेय, नाशिक पोलीस परिक्षेत्राच्या वतीने परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर, जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी सूरज मांढरे, ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील आदींनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. यानंतर केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या तुकडीने बंदुकीच्या फैरी झाडून तसेच अंतिम बिगुल वाजवून असिस्टंट कमांडन्ट नितीन भालेराव यांना अखेरची मानवंदना दिली
शहीद नितीन भालेराव यांच्या पश्चात आई भारती, पत्नी रश्मी, मुलगी अन्वी, तर दोन भाऊ अमोल व सुयोग असा परिवार आहे.

Related Posts
-
सावखेड्याचे वीरजवान मंगलसिंग परदेशी यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
जळगाव/प्रतिनिधी - सावखेडा बु., ता. पाचोरा येथील वीरजवान मंगलसिंह जयसिंह परदेशी…
-
प्रा. एन. डी. पाटील यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
नेशन न्यूज मराठी टीम. कोल्हापूर - ज्येष्ठ विचारवंत प्रा. एन. डी.…
-
कोवीड रुग्णांवर विनामूल्य अंत्यसंस्कार करण्याचा केडीएमसीचा निर्णय
कल्याण/ प्रतिनिधी - कल्याण डोंबिवलीमध्ये एकीकडे कोरोना रुग्णांचा आकडा दिवसागणिक…
-
इंडियन कोस्ट गार्डमध्ये असिस्टंट कमांडंट जनरल पदांची भरती
पदाचे नाव - असिस्टंट कमांडंट जनरल (पुरूष) एकूण जागा - २५ (अनुसूचित…
-
शहीद जवान सुरज शेळके यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
नेशन न्यूज मराठी टीम. सातारा - शहीद जवान सुरज शेळके…
-
शहीद जवान विपुल इंगवले यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
नेशन न्यूज मराठी टीम. सातारा - शहीद जवान विपुल इंगवले…
-
शहीद सुधाकर शिंदे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
नांदेड/प्रतिनिधी - नांदेड जिल्ह्याचे भूमिपुत्र सहाय्यक समादेशक शहीद सुधाकर राजेंद्र…
-
ज्येष्ठ उद्योगपती पद्मभूषण राहुल बजाज यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे - ज्येष्ठ उद्योगपती पद्मभूषण राहुल…
-
ऑस्ट्रियाच्या शिष्टमंडळाने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घेतली भेट
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - ऑस्ट्रियाच्या भारतातील राजदूत…
-
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे ग्रीन हायड्रोजनबद्दल जनजागृती करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - केंद्रीय रस्ते वाहतूक…
-
ज्येष्ठ समाजसेविका पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
नेशन न्युज मराठी टीम. पुणे - ज्येष्ठ समाजसेविका पद्मश्री सिंधुताई सपकाळ…
-
अक्षय भालेराव यांच्या हत्येच्या निषेधार्थ कल्याण तहसील कार्यालयावर वंचितचा मोर्चा
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कल्याण येथील तहसील…
-
वीर जवान मनोज माळी यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
नेशन न्यूज मराठी टीम. धुळे/प्रतिनिधी - ‘अमर रहे…, अमर रहे… वीर…
-
पालकमंत्री नितीन राऊत यांच्या हस्ते ३५० दिव्यांगांना विविध साहित्याचे वाटप
नागपूर/प्रतिनिधी - जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, नागपूर व राष्ट्रीय दृष्टी…
-
चंद्रशेखर आझाद यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आंबेडकरी जनता आक्रमक
नेशन न्यूज मराठी टीम. धुळे/प्रतिनिधी - उत्तर प्रदेश मधील सहारनपूर…
-
शहीद जवान जयसिंग भगत यांच्यावर सैनिकी इतमामात अंत्यसंस्कार
नेशन न्यूज मराठी टीम. सांगली/प्रतिनिधी - सियाचीन येथे सैन्य दलात…
-
लॉकडाऊन काळात उद्योगांमध्ये स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी पालकमंत्री डॉ.नितीन राऊत
प्रतिनिधी. नागपूर : जिल्ह्यातील हिंगणा, कळमेश्वर, बुटीबोरी, उमरेड येथील उद्योगांमधील…
-
नागपुरात ड्राइव्ह इन लसीकरण केंद्र उभारण्याची पालकमंत्री नितीन राऊत यांची मागणी
नागपूर/प्रतिनिधी - नागपूर जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मुंबईच्या…
-
शहीद जवान सुजित किर्दत यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
प्रतिनिधी. सातारा- सातारा जिल्ह्यातील चिंचणेर निंब गावचे जवान सुजित किर्दत…
-
वीज कंपन्यांचे खासगीकरण होऊ देणार नाही – ऊर्जामंत्री नितीन राऊत
नेशन न्यूज मराठी टीम. शिर्डी - महावितरण, महापारेषण व महानिर्मिती या…
-
शहीद वीर जवान सोमनाथ मांढरे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
सातारा/प्रतिनिधी - शहीद वीर जवान सोमनाथ मांढरे यांच्या पार्थिवावर आज आसले…
- नितीन गडकरींना केंद्रीय सत्तेतून बाद कऱण्याचं कूटीर कारस्थान चालू आहे - विनायक राऊत
नेशन न्यूज मराठी टीम. हिंगोली / प्रतिनिधी - हिंगोली जिल्ह्यात…
-
ऊर्जा संवर्धनाच्या जनजागृतीसाठी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याकडून चित्ररथाचे उद्घाटन
मुंबई/प्रतिनिधी - ‘राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन’ तसेच ‘ऊर्जा संवर्धन आठवड्या’चे औचित्य…
-
अहमदनगर आगामी काळात लॉजिस्टिक पार्कचा जिल्हा म्हणून नावारूपास येणार - मंत्री नितीन गडकरी
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. अहमदनगर/प्रतिनिधी - अहमदनगर जिल्ह्यात केंद्रीय महामार्ग…
-
उत्पन्न वाढीसाठी शेतकऱ्यांनी तेलबिया उत्पादनाकडे वळण्याची गरज - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे/प्रतिनिधी - कृषी उत्पादन संस्थाचे काम…
-
आंबिवली स्मशाभूमी गेल्या ५ वर्षांपासून छताच्या प्रतीक्षेत, अंत्यसंस्कार झाल्यावर पावसाळ्यात वारंवार द्यावा लागतोय अग्नी
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - आंबिवली येथील स्मशानभूमीमध्ये होणारे…
-
गड-किल्ल्यांच्या रोपवेसाठी महाराष्ट्रातून येणारे सर्व प्रस्ताव मंजूर करणार- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
नेशन न्यूज मराठी टीम. रायगड - महाराष्ट्राला विशेषतः कोकणाला गड-किल्ल्यांचा…
-
कोरोना झालेल्या व्यक्तींच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करणाऱ्या सामाजिक संस्था,संघटनेच्या कर्मचाऱ्यांना २५ लाखाचे विमा संरक्षण - मंत्री हसन मुश्रीफ
प्रतिनिधी. मुंबई - कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यु पावलेल्या व्यक्तींचा अंत्यसंस्कार विधी करणारे ग्रामीण…
-
आपल्याला जगातली आर्थिक शक्ती व्हायचं असेल तर आपण तंत्रज्ञानाचा उपयोग केला पाहीजे - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण /प्रतिनिधी - आपल्याला जगातली आर्थिक…
-
साखर कारखान्यांनी साखरेचे रुपांतरण इथेनॉलमध्ये करणे उद्योगाच्या चांगल्या भविष्यासाठी आवश्यक आहे- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - केंद्रीय रस्ते वाहतूक…