कल्याण/ प्रतिनिधी– कल्याण आणि उल्हासनगर शहरा बरोबर कल्याण ग्रामीण भागातील १५ ते वीस गावांना विकास होऊन प्रवासाचे अंतर कमी करण्यात मैलाचा दगड मोहाने- कांबा (पावशे पाडा ) पूल ठरणार आहे एकूण साडे तीन कोटी रस्त्याला निधी मंजूर झाला असून आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते भूमिपूजन रविवारी २३ मे रोजी सकाळी संपन्न झाला आहे यावेळी कांबा ग्रामपंचायतीचे सरपंच आणि उपसरपंच सह अधिकारी वर्ग आणि कार्यकत्ये ,स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्य उपस्थित होते.मोहाने – कांबा पावशेपाडा पूल अनेक वर्षांपासून काम सुरू होते पुलाचा काही भाग अपूर्ण असून त्याला रस्त्या नव्हता काही कारणाने रखडला होता स्थानिक शेतकरी आणि जमीन मालक यांना विश्वासात घेऊन पूल पूर्ण करण्याचे काम हाती घेतले आहे.
नाबार्ड कडून पुलाच्या बांधकामासाठी ५ कोटी खर्च केला असून आमदार किसन कथोरे यांनी आता रस्त्यासाठी साडे तीन कोटी निधी मंजूर करण्यात मदत केली आहे अंबरनाथ विधान सभेचे कथोरे आमदार असताना मोहने आणि स्थानिक ग्रामस्थ च्या मागणी मुळे निधी आणला होता रविवारी ता २३ सकाळी उर्वरित रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते संपन्न झाले . या पुलामुळे मोहाने आंबिवली याला उल्हासनगर , अंबरनाथ , शहाड आणि कल्याण ग्रामीण भागातील अनेक गावे जोडली जाऊन प्रवासाचा अंतर कमी होऊन परिसरात विकास होण्यास मदत होणार आहे . दरम्यान भूमी पूजन कार्यक्रमा प्रसंगीं यावेळी कांबा ग्रामपंचायतीचे सरपंच भारती महेंद्र भगत, उपसरपंच संदीप कुंडलिक पावशे , सदस्य छाया कुंडलिक बनकरी, इशा विजय भोईर आणि माजी कल्याण कृषि बाजार समितीचे सभापती रवींद्र घोडविंदे ,माजी सरपंच मंगेश बनकरी , छगन बनकरी , विलास उबाळे , संतोष शिंगोळे ,काळूराम भगत , मधुकर पावशे , भगवान शिरोसे ,नारायण पावशे, कार्यकत्ये आणि महिला वर्ग उपस्थित होते .