प्रतिनिधी.
डोंबिवली – दोन वर्षापूर्वी व्हाॅटसअपच्या मेसेजवरून झालेल्या हाणामारीत धारदार शस्त्राने वार करून एकाची निर्घुण हत्या केल्याची घटना डोंबिवली पूर्वेकडील जुनी डोंबिवली परीसराजवळील सखाराम कॉम्लेसच्या समोरच्या रोडवर घडली होती.पोलिसांनी याप्रकरणी ९ जणांना अटक केली होती. तर उर्वरित तीन मारेकऱ्यांचा पोलीस कसून शोध घेत होते.फरार आरोपींपैकी दोन मारेकऱ्यांना १८ नोव्हेंबर रोजी विष्णूनगर पोलिसांनी अटक करून बेड्या ठोकल्या. तर या हत्येतील फरार आरोपी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विशाल सुरेश गायकवाड ( २४ रा.शास्त्रीनगर , डोंबिवली पश्चिम ) आणि अरविंद कामता प्रसाद ( २१ ,रा.कोपर रोड, डोंबिवली पश्चिम ) असे अटक आरोपींची नावे असून तिसरा फरार आरोपी सोनू गुप्ता ( २४,उत्तरप्रदेश) याचा पोलिसांनी कसून शोध घेत अटक केली. २९ जुलै २०१८ रोजी दुपारी पाच वाजण्याच्या सुमारास फिर्यादी रोहित विनोद जोशी आणि त्याचा मित्र सौरभ मोहिते यांनी पाठवलेल्या व्हाॅटसअपच्या मेसेजवरून आरोपी अशोक सिंग, नंदू पवार व त्यांचे झालेले भांडण मिटवण्यासाठी रोहितचे काका कुंदन जोशी, मुकेश जोशी आणि रोहितचे मित्र निलेश शिंगारे, परशुराम वारकरी, मयूर सुर्वे हे डोंबिवली पूर्वेकडील जुनी डोंबिवली परीसराजवळील सखाराम कॉम्लेसच्या समोरच्या रोडवर आले.अशोक सिंग, नंदू पवार, महेश पवार,युसुफ रईस खान,निरज संतोष दुबे, हर्ष सोलंकी, रोहन म्हात्रे व इतर ४ अनोळखी इसम हे तलवार, चाकू, लाठ्या-काठ्या, कोयता घेऊन हल्ला करण्याच्या इराद्याने रोहित जोशी यांचे काका कुंदन जोशी व मुकेश जोशी, निलेश शिंगारे, परशुराम वारकरी, मयूर सुर्वे यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून जखमी केले. तसेच या हल्ल्यात मारेकऱ्यांनी रोहित जोशीचे काका कुंदन जोशी यांची हत्या केली.
या हत्येप्रकरणी विष्णूनगर पोलिसांनी ९ जणांना अटक केली होती. तर उर्वरित तीन आरोपी फरार होते. फरार आरोपींचा विष्णूनगर पोलीस कसून शोध घेत होते. हत्या झाल्याच्या दोन वर्षानंतर विशाल सुरेश गायकवाड आणि अरविंद कामता प्रसाद यांना अटक करून गजाआड केले.तिसरा आरोपी सोनू गुप्ता हा डोंबिवलीत आपल्या नातेवाईकांना भेटण्यास येणार असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याला अटक करून गजाआड केले.विष्णूनगर पोलीस ठाण्याचे वपोनि संजय साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि.गणेश वडणे,पो.हवालदार युवराज तायडे, विनोद निकम, संगप्पा भुजबळ,शशिकांत नाईकरे,पो.ना.राजेंद्र पाटणकर,भगवान सांगळे,पो.कॉ.कुंदन भामरे,सचिन कांगुणे, बडगुजर ,महाजन यांनी सापळा फरार आरोपींना अटक केली.