नेशन न्युज मराठी टिम.
मुंबई – काजूबोंडे, मोहाफुले यांपासून उत्पादित केलेल्या मद्याची वर्गवारी “देशी मद्य” याऐवजी “विदेशी मद्य” अशी करुन या पदार्थांसह फळे, फुलांच्या मद्यार्काद्वारे “स्थानिक मद्य” निर्मितीच्या धोरणास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.
काजूबोंडे व मोहाफुलांच्या मद्यार्कापासून बनविण्यात येणाऱ्या मद्याचे वर्गीकरण हे 2005 पासून “देशी मद्य” असे करण्यात आले होते. या वर्गीकरणामुळे या मद्याच्या विपणनास व मुल्यवृद्धीस मर्यादा येत होत्या. त्यामुळे काजूबोंडे, मोहाफुले या पदार्थांसह स्थानिकरित्या उत्पादित होणाऱ्या फळे, फुले यापासून तयार होणाऱ्या मद्यार्कापासून जे मद्य तयार केले जाईल त्यास ‘देशी मद्य’ याऐवजी ‘विदेशी मद्य’ असा दर्जा देण्यास मान्यता देण्यात येत आहे. अशा मद्यार्कापासून निर्मित होणाऱ्या मद्यास “स्थानिक मद्य” असे संबोधण्यात येईल.
काजूबोंडे, मोहाफुले यासह स्थानिकरित्या उपलब्ध होणारे फळे-फुले यापासून तयार होणाऱ्या मद्यार्कापासून पेय मद्य निर्मिती होईल. यामुळे नैसर्गिक आपत्तीमध्ये वाया जाणाऱ्या व नाशवंत अशा उत्पादनांचा वापर होऊन, त्यांची मुल्यवृद्धी होईल. याचा फळे, फुले उत्पादकांना लाभ होणार आहे. याशिवाय, एक स्वतंत्र उद्योग निर्माण होऊन राज्यात रोजगार निर्मिती बरोबरच महसूलात वाढ अपेक्षित आहे.
याकरिता स्थानिक फळे, फुले इत्यादीपासून मद्यार्क उत्पादनाकरिता आसवनी परवाना देण्यास बैठकीत मान्यता देण्यात आली. फळे, फुलांच्या उपलब्धतेनुसार कमी मद्यार्क उत्पादित झाल्यास अशा परिस्थितीत अथवा गरजेनुसार एखाद्या फळा, फुलांपासून उत्पादित मद्यार्काची दुसऱ्या फळा, फुलांपासून उत्पादित मद्यार्कामध्ये मिश्रण (ब्लेंडीग) करण्यास मुभा राहणार आहे. फळे, फुले यापासून तयार होणाऱ्या मद्यार्कापासून उत्पादित होणाऱ्या मद्यावरील उत्पादन शुल्काचा दर सवलतीचा राहील.
या मद्याची विक्री ही नमुना एफएल-2 (सीलबंद किरकोळ विदेशी मद्य विक्रीचे दुकान), एफएल-3 (परवाना कक्ष), एफएल-4 (क्लब अनुज्ञप्ती) व एफएल 4-अ (विशेष कार्यक्रमासाठीची तात्पुरती अनुज्ञप्ती) या किरकोळ मद्य विक्रीच्या परवानाधारकांकडून करण्यास परवानगी राहील.
या धोरणानुसार उत्पादनाशी संबंधित द्यावयाचे सर्व परवान हे एक खिडकी योजनेमार्फत देण्यात येतील. या प्रस्तावाच्या अनुषंगाने महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम, 1949 अंतर्गत सध्याच्या नियमात विभागस्तरावर आवश्यक ते बदल करण्यासही मान्यता देण्यात आली.
Related Posts
-
धारावी येथे बनावट विदेशी मद्य बनविणाऱ्या तिघांना अटक
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई - खात्रीलायक माहिती मिळाल्यावरुन राज्य…
-
कोरोचीत टेपिंगसह तयार होणारे पीपीई किट डिआरडीओ प्रमाणित
प्रतिनिधी. कोल्हापूर - कोरोना संशयित आणि बाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या…
-
निर्माल्यातील फुलांपासून साकारली गणेश मूर्ती
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई / प्रतिनिधी - गणेशोत्सवाच्या…
-
बाप्पाच्या आगमनासाठी फुलांचे गरुड झेप रथ तयार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई / प्रतिनिधी - गणेशोत्सवाच्या आगमनाच्या…
-
बनावट मद्य निर्मितीच्या कारखान्यावर छापा
नेशन न्यूज मराठी टीम. धुळे / प्रतिनिधी - साक्री तालुक्यातील…
-
लॉकडाऊनमध्ये महिलांनी तयार केले साडेचार हजार खादी मास्क
प्रतिनिधी. नागपूर- ‘लॉकडाऊन’च्या काळात महिलांना रोजगार उपलब्ध करुन देण्याच्या उपक्रमांतर्गत…
-
बांबू पासून तयार केलेली पारंपारिक झोपडी ठरतेय कृषी प्रदर्शनातील आकर्षण
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. नंदुरबार/प्रतिनिधी - नंदुरबार शहरात खानदेश…
-
मतदान जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांचा अनोखा उपक्रम, तयार केली मानवी साखळी
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. चंद्रपूर/प्रतिनिधी – तरुणाई ही देशाच्या…
-
मुस्लीमांबद्दल राहुल गांधी, काँग्रेस बोलायला तयार नाही - फारूक अहमद
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई / प्रतिनिधी - हरियाणा नूह…
-
केडीएमसीने ट्रान्सफॉर्मर उभारणीसाठी तयार केले सुरक्षित सुबक मॉडेल
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने कल्याण…
-
हवेतून ऑक्सिजन तयार करणाऱ्या १४ प्लांटच्या उभारणीस सुरूवात
मुंबई/प्रतिनिधी - ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेऊन हवेतून ऑक्सिजन तयार करणारे १४…
-
कारागृहातील बंदीजनांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री
नेशन न्युज मराठी टिम. पुणे/प्रतिनिधी - मकर संक्रांती सणानिमित्त कारागृहातील…
-
डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स तयार करण्याच्या केडीएमसी आयुक्त यांच्या सूचना
कल्याण/प्रतिनिधी - अतिवृष्टीमध्ये तसेच आपत्कालिन परिस्थितीत नागरिकांना मदत करण्यासाठी महापालिकेचा स्वत:चा…
-
जीएसटीची बोगस विक्री देयके तयार केल्याप्रकरणी आणखी एकास अटक
मुंबई/प्रतिनिधी - वस्तू व सेवा कराची (जीएसटी) बोगस विक्री देयके तयार…
-
हस्तकलाकार आणि छोट्या उद्योगांतून तयार होणाऱ्या वस्तू आता फ्लिपकार्ट वर
मुंबई प्रतिनिधी - महाराष्ट्र शासनाचे लघु उद्योग महामंडळ तसेच खादी…
-
अवयवदान वाढण्यासाठी कृती आराखडा तयार करण्याच्या आरोग्यमंत्री यांच्या सूचना
नेशन न्युज मराठी टिम. मुंबई- राज्यातील अवयवदान वाढण्यासाठी कृती आराखडा…
-
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत लाखोंचा मद्य साठा जप्त
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - मुंबई उपनगरांमधील अनेक…
-
ओबीसी राजकीय आरक्षण, इंपिरिकल डेटा तयार करण्याबाबत सर्वपक्षीय बैठकीत सहमती
मुंबई/प्रतिनिधी - ओबीसींना राजकीय आरक्षण मिळण्याच्या दृष्टीने राजकीय मागासलेपण स्पष्ट करणारा…
-
मुंबई विमानतळावर विदेशी महिले कडून २० कोटी रुपयांचे कोकेन जप्त
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - नैरोबीहून मुंबईला आलेल्या…
-
बनावट विदेशी मद्याची निर्मिती करणाऱ्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा छापा
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई - मोरी रोड, माहिम येथील…
-
सिलबंद विदेशी मद्याच्या विक्री परवान्यांसाठी नवीन दोन श्रेणी
नेशन न्युज मराठी टिम. मुंबई - राज्यात सिलबंद विदेशी मद्याच्या…
-
नागपूरच्या राजेश जोशींनी तयार केले सर्वात छोटे व हलके विमान
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नागपूर/प्रतिनिधी - जगभरात असे कुठलेच…
-
धोकादायक इमारतीबाबत क्लस्टर आराखडा तयार करण्याचे नगरविकास मंत्री यांचे निर्देश
मुंबई/प्रतिनिधी - एमएमआर क्षेत्रातील धोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी…
-
अवैधरित्या मद्य साठवणूक विरोधातील धडक कारवाईत २० लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त
नेशन न्यूज मराठी टीम. नांदेड- राज्य उत्पादक शुल्क देगलूर विभागाच्या…
-
११९ खोट्या कंपन्या तयार करण्याच्या आरोपावरून जयपूर येथून एकास अटक
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी- सामान्य नागरिकांच्या पॅन व आधार…
-
ठाणे जिल्हात भाजी,फळे बाजार उद्यापासुन नियमितपणे सुरु होणार-जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर
प्रतिनिधी. ठाणे दि. १४- ठाणे जिल्ह्यातील सर्व महानगरपालिका, नगरपरिषद व नगरपंचायत…
-
अजगर, पाली, कासवे आणि घोरपड असे ६६५ विदेशी प्रजातींचे प्राणी जप्त, दोघांना अटक
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - डीआरआय अर्थात महसूल गुप्तचर…
-
कल्याण क्राइम ब्रांचची मोठी कारवाई, आडीवली परिसरातील बनावटी डिझेल तयार करणाऱ्या गोदामावर छापा
प्रतिनिधी. कल्याण - कल्याण ग्रामीण मधील आडीवली ढोकळी परिसरात एका…
-
रेल्वे कडून सिमेन्स इंडिया कंपनीला ९००० एचपी इलेक्ट्रिक मालवाहू इंजिन तयार करण्याचे कंत्राट
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारतीय रेल्वेनं सिमेन्स…
-
मोहोळ पोलिसांकडून विदेशी दारू साठ्यासह एकूण १४ लाख ४१ हजार ९० रुपयांचा मुद्देमाल जप्त
सोलापूर/प्रतिनिधी - कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी मोहोळ पोलीस पेट्रोलिंग करीत असताना…
-
जानेफळ पॅटर्न, कोरोना लसीकरणात आपला स्वत:चा पॅटर्न तयार करणारे गाव
औरंगाबाद/ प्रतिनिधी - आज कोरोना या आजाराविषयी बरीच चुकीची माहिती…
-
६७ लाख रूपये किंमतीचे विदेशी मद्याचे ६२५ खोके ट्रकसह जप्त, राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
मुंबई/प्रतिनिधी - गोवा राज्यात निर्मिती व विक्रीसाठी असलेल्या भारतीय बनावटीच्या…
-
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोल्हापूर जिल्हा पथकाची कारवाई ३१ लाख किमतीचा बनावटी विदेशी मद्यसाठा जप्त
मुंबई/प्रतिनिधी - राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोल्हापूर जिल्हा भरारी पथकाने…