महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
थोडक्यात बिझनेस

२७ फेब्रुवारीपासून कोळसा मंत्रालय व्यावसायिक कोळसा खाणींचा लिलाव करणार सुरू

नेशन न्यूज मराठी नेटवर्क.

नवी दिल्ली/प्रतिनिधी – कोळसा मंत्रालयाने 03 नोव्हेंबर 2022 रोजी व्यावसायिक कोळसा खाणींच्या लिलावाची 6 वी फेरी आणि 5 व्या फेरीचा दुसरा टप्पा सुरू केला, याला उद्योग क्षेत्राकडून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आणि 36 कोळसा खाणींसाठी 96 निविदा प्राप्त झाल्या, यात प्रथमच बोली लावणाऱ्यांचाही सहभाग होता, हे बोलीदारांमधील उत्साह आणि कोळसा खाण क्षेत्राविषयी सकारात्मक भावना प्रतिबिंबित करते.

तांत्रिक मूल्यमापन पूर्ण झाल्यानंतर, एकापेक्षा जास्त बोली प्राप्त झालेल्या 27 कोळसा खाणी सोमवार, 27 फेब्रुवारी 2023 पासून पुढच्या लिलावासाठी ठेवल्या जातील. बोलीदारांना लिलाव प्रक्रियेशी परिचित करण्यासाठी, मॉक ई-लिलाव शुक्रवार, 24 फेब्रुवारी 2023 रोजी आयोजित केला जाईल. बोलीदारांना लिलाव प्रक्रियेशी परिचित करण्यासाठी, शुक्रवार, 24 फेब्रुवारी 2023 रोजी प्रत्यक्ष ई-लिलावासारखा, लिलाव सराव आयोजित केला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×