नेशन न्यूज़ मराठी टिम.
नवी मुंबई/प्रतिनिधी– बाहेरच्या देशात नोकरीसाठी पाठवणार सांगत अनेक नागरिकांची फसवणूक केल्याचा प्रकार नवी मुंबईमध्ये समोर आला आहे. फॉरेन कंट्रीझमधील कंपीनीमध्ये नोकरी लावून देतो सांगत, कोट्यवधींचा गंडा घातला आहे. लोकांकडून पैसे घेणाऱ्या टोळीला एपीएमसी पोलिसांनी अवघ्या अठ्ठेचाळीस तासात कारवाई करत आरोपींना अटक केली आहे.
दोन आरोपींना ताब्यात घेतले असून दोन आरोपी फरार आहेत. लीना अरोरा, पुनीत अरोरा, विकी जोसेफ , युनूस अन्सारी अशी या आरोपींची नावे आहेत. अवघ्या कमी वेळात एपीएमसी पोलिसांनी ही कारवाई केल्याने पोलीस प्रशासनाचे कौतुक होत आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.