Desk Marathi News

महत्वाच्या बातम्या

बनावट कागदपत्रांच्या आधारे चोरीच्या वाहनांची विक्री,९ जन गजाआड दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत
Default Image चर्चेची बातमी पोलिस टाइम्स

कल्याणात मुंगूसाची शिकार करणाऱ्या चौघांना अटक

कल्याण/प्रतिनिधी – कल्याण येथील एपीएमसी मार्केट परिसरात बुधवारी सकाळी चार अज्ञात इसमांनी मुगंसाची शिकार करत असल्याची घटना घडली. स्थानिक जागरूक नागरिकांनी या घटनेची दखल घेत चारही आरोपीस चोप दिला व बाजारपेठ पोलीस स्थानकास कळवले. बाजारपेठ पोलीसनी तातडीने कल्याण वनविभागाकडे गुन्हा वर्ग करीत चार आरोपींना कल्याण वनखात्याच्या ताब्यात दिले. ताब्यात घेतलेल्या आरोपीना 1 दिवसाची वन खात्याची पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे.साधेदुखीवर मुगंसाचे तेल औषध म्हणून वापर तसेच मुंगूसच्या केसाचा वापर ब्रश बनविण्यासाठी होतो. तसेच मुंगूसला बाजारात चांगली किंमत मिळत असल्याने या चार जणांनी मुगंसाची शिकार करून हत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज सुंत्रानी वर्तवला आहे.

संजू समय्या मोटम (वय 32), भोलानाथ शंकर पास्तम (वय 30), जलाराम समय्या पास्तम (वय 32), बसवय्या शंकर पास्तम (वय 32) आदी अटक झालेल्या आरोपींची नावे आहेत. सर्व आरोपी मांडा टिटवाळा येथील व वासुंद्री रोड याठिकाणी राहणारे आहेत.सदर आरोपींना वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ नुसार अनुसूचि २ भाग २ सादर मुंगूस प्रजाती मोडत असल्याने याअंतर्गत १ दिवसाची वन खात्याची पोलीस कोठडीत ठेवण्यात आले असून गुरुवारी न्यायालयात हजर करणार आहेत. याप्रकरणी वन परिक्षेत्र आधिकारी रघुनाथ चन्ने यांच्या मार्गदर्शनखाली मच्छिंद्र जाधव आणि योगेश रेंगणे आणि रोहित भोई उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
X