Desk Marathi News

महत्वाच्या बातम्या

बनावट कागदपत्रांच्या आधारे चोरीच्या वाहनांची विक्री,९ जन गजाआड दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत
लोकप्रिय बातम्या हिरकणी

लॉकडाऊनमध्ये महिलांनी तयार केले साडेचार हजार खादी मास्क

प्रतिनिधी.

नागपूर– ‘लॉकडाऊन’च्या काळात महिलांना रोजगार उपलब्ध करुन देण्याच्या उपक्रमांतर्गत ताजबाग परिसरातील महिलांनी तयार केलेल्या चार हजार  360 खादीचे मास्क कोविड अंतर्गत कार्यरत असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांना लेबर एज्युकेशन ॲन्ड रिसर्च नेटवर्कच्या श्रीमती किरण ठाकरे यांच्या हस्ते देण्यात आले.

‘लॉकडाऊन’च्या काळात महिलांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासोबतच कोरोनावर मात करण्यासाठी आवश्यक असलेल्या खादीच्या मास्कची निर्मिती केली. लेबर एज्युकेशन ॲन्ड रिसर्च नेटवर्कच्या उपक्रमाचे विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी स्वागत केले.

‘लॉकडाऊन’च्या काळात रोजगार गेलेल्या महिलांना लेबर एज्युकेशन ॲन्ड रिसर्च नेटवर्क लर्नच्या माध्यमातून खादीचे मास्क तयार करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले होते. एचसीएल फाऊंडेशनतर्फे या उपक्रमाला आर्थिक मदत देण्यात आली होती. ‘लॉकडाऊन’मध्ये ज्या महिला रोजगारापासून वंचित झाल्या होत्या त्यामध्ये मोठा ताजबाग परिसरातील महिलांचा समोवश आहे. यामध्ये श्रीमती शमीन बी. शहनशाह, नसिमा बानो, समीना परवीन, समीना शेख, खुशबू खातून, रुबिना परवीन, रोजीन हरकतऊल्ला, फुलसाना परवीन, नसीम शेख, शहजादी शेख वहिद  निलोफर नाज, शमसुनिशा शेख आदींचा समावेश आहे.

लर्न नागपूरतर्फे महिलांना खादीचे मास्क तयार करण्यासाठी प्रशिक्षण देण्यात आले होते. या उपक्रमांतर्गत महिलांनी खादीचे मास्क तयार केले असून आरोग्य कर्मचाऱ्यांना हे मास्क उपयुक्त ठरणार आहेत. खादी मास्क तयार करण्यासाठी तत्कालीन अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी प्रोत्साहन दिले होते.  या उपक्रमामुळे महिलांना रोजगार उपलब्ध झाला असल्याची माहिती वर्कर वेलफेअर रिसर्च ॲन्ड ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचे जम्मू आनंद यांनी दिले.

Translate »
X