नेशन न्यूज मराठी टिम.
पनवेल/प्रतिनिधी– पनवेल महानगर पालिका स्थापन झाल्यानंतर प्रथमचं भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. गट अ ते गट ड मधील 377 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे.अवघ्या दोन दिवसात साडेचार हजारांहून अधिक उमेदवारांनी अर्ज भरला आहे, तर आणखी लाखांहून अधिक अर्ज येण्याची शक्यता आहे, हि भरती प्रक्रियेची परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होणार आहे, तसेच नवख्या अर्जदारांसह अनुभव असलेल्यांना देखील घेतले जाणार आहे. तसेच सदर भरती प्रक्रिया अत्यंत पारदर्शक पद्धतीने होणार असून नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या आमिषांना बळी पडू नये असे आवाहन पनवेल महानगर पालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांनी केले आहे.