महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
Default Image राजकीय

राष्ट्रवादीमध्ये धनदांडग्यांच्या गटाकडून गरिब कार्यकर्त्यांचा छळ,राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष यांचा आरोप

कल्याण/प्रतिनिधी  राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीमध्ये धनदांडग्यांच्या गटाकडून गरिब कार्यकर्त्यांचा छळ सुरु असून आपल्याला विश्वासात न घेता पदमुक्त केल्याचा आरोप राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे कल्याण डोंबिवली माजी जिल्हाध्यक्ष प्रसाद महाजन यांनी केला आहे. याबाबत त्यांनी प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे तक्रार करत संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

      ३० जानेवारी २०२० रोजी प्रसाद महाजन यांना राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पक्षाच्या कल्याण डोंबिवली जिल्हा अध्यक्ष या पदावर नियुक्ती करण्यात आली. पदभार स्वीकारल्यानंतर काही दिवसातच संपूर्ण देशभर कोरोना प्रादुर्भावामुळे संपूर्णता लाकडाऊन लावण्यात आल्याने सर्व कॉलेज शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांशी थेट संपर्क होणे शक्य नव्हते. अशातही महाजन यांनी संपर्कातील राष्ट्रवादी विचारांशी एकनिष्ठ असणारया विद्यार्थ्यांशी संपर्क करुन संघटना बांधणी सुरू केली. विद्यार्थी संघटना वाढीस सुरवात केली.

 या नियुक्तीला कालावधी १६ महीनेही पुर्ण झालेला नसताना अचानकपणे जुन २०२१ मध्ये विश्वासात न घेता कुठल्याही प्रकारची चर्चा न करता पदमुक्त करण्यात आले. पक्षातील एक धनदांडग्यांचा गट संघटनेत काम करणाऱ्या सामान्य कुटुंबातील गरिब कार्यकर्ताचा छळ करत अपमानास्पद वागणूक देत सतत हेटाळणी करत असल्याचा आरोप प्रसाद महाजन यांनी केला आहे. 

या सर्व प्रकाराला राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे कोकण विभाग अध्यक्ष किरण शिखरे हे जावाबदार असून त्यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवाराचा प्रचार केला असल्याचे महाजन यांचे म्हणणे असून याबाबत पक्षातील वरीष्ठ नेत्यांकडे तक्रार केली असून याविषयी सखोल चौकशी करत योग्य ती कारवाई करण्याचे शाश्वत आश्वासन पक्षातील वरीष्ठ नेत्यांकडून देण्यात आले असल्याचे महाजन यांनी सांगितले. 

दरम्यान याबाबत राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे कोकण विभाग अध्यक्ष किरण शिखरे यांना विचारले असता, प्रसाद महाजन हा मूळचा शिवसैनिक त्यामुळे त्यांनी मला पक्षनिष्ठा शिकवू नये. कल्याण डोंबिवली विद्यार्थी अध्यक्ष पदाची जबाबदारी प्रसादकडे असताना संघटनेचे काम असमाधान कारक होते. त्या मुळे विद्यार्थी प्रदेश अध्यक्ष व स्थानिक राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा अध्यक्ष अप्पा शिंदे व जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. वंडार पाटील यांच्या शिफारशी वरून सुजित रोकडे यांना जबाबदारी देण्यात आली आहे. आज राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस मध्ये मोठ्या प्रमाणात युवा सेनेचा प्रवेश होत असून प्रसाद महाजन हे आरोप जाणीवपूर्वक सुपारी घेऊन करत असल्याचे त्यांनी सांगितले.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×