Desk Marathi News

महत्वाच्या बातम्या

बनावट कागदपत्रांच्या आधारे चोरीच्या वाहनांची विक्री,९ जन गजाआड दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत
Default Image राजकीय

आदिवासींच्या विविध मागण्यांसाठी वंचित व अ. भा. आदिवासी विद्यार्थी महासंघाचे उपोषण

नेशन न्यूज मराठी टीम.

जळगाव / प्रतिनिधी – महाराष्ट्रात कांद्याच्या निर्यात दर वाढीने एकीकडे शेतकरी आक्रमक झाले आहेत तर दुसरीकडे मराठा व धनगर समाज बांधव आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करत आहेत. यातच आता आदिवासी बांधव देखील आपल्या मागण्यांसाठी आक्रमक झालेले दिसून आले. यावल येथे आदिवासींच्या विविध मागण्यांसाठी प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयावर वंचित बहुजन आघाडी व अ. भा. आदिवासी विद्यार्थी महासंघतर्फे वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे, अ. भा. आदिवासी विद्यार्थी महासंघ अध्यक्ष साहिल तडवी यांच्या नेतृत्वात आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. आंदोलकांनी विविध घोषणांनी प्रकल्प कार्यालय परिसर दणाणून सोडला.

प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांनी उपोषण स्थळी भेट देऊन सर्व मागण्या संदर्भात सकारात्मक चर्चा केली.
आदिवासी विकास प्रकल्प यांचे अधिकारी आदिवासी पाड्यांवर न फिरता दलालामार्फत सर्वे करीत असल्यामुळे आदिवासींपर्यंत विविध योजनांचा लाभ पोहोचत नाही व अधिकारी कार्यालयात आलेल्या आदिवासी बांधवांशी उध्दटपणे बोलतात. आदिवासींचे सुरू असलेले वन दावे तात्काळ मंजूर करून सातबारा त्यांच्या नावावरती करण्यात यावा, ग्रामपंचायतमार्फत घरकूल योजनेचा लाभ त्यांना देण्यात यावा. अशा मागण्या उपोषणकर्त्यांनी केल्या आहेत.

आंदोलनात जिल्हा महासचिव दिनेश इखारे, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा वंदना सोनवणे, कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष बालाजी पठाडे, जिल्हा संघटक राजेंद्र बारी,जिल्हा सचिव दिपक मेघे असे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते आंदोलनात सहभागी होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
X