नाशिक/प्रतिनिधी – एकाच आठवड्यात नाशिक (Nashik) शहरात बनावट नोटा तयार करणाऱ्या दोन टोळ्यांना जेरबंद करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांचा गोंधळ उडाला आहे. नाशिक शहरात दोन दिवसांपूर्वी अंबड पोलिस स्टेशनच्या हद्दीत बनावट नोटा सापडल्या होत्या. यामध्ये तीन आरोपींना अटक करण्यात आली. आरोपींकडून लॅपटॉप आणि प्रिंटर जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणात पुढील तपास अंबड पोलिस करत आहेत.
गुप्त माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या (Crime branch) गुंडाविरोधी पथकाने काल पुन्हा छापा टाकून बनावट नोटा छापणाऱ्या महिला आरोपींना ताब्यात घेतले आहे. या दोन महिला आरोपींकडून एकूण रक्कम 10 हजार असणाऱ्या 500 च्या बनावट जप्त करण्यात आल्या आहेत. नागरिकांनी सतर्क राहावे तसेच संशय आल्यास पोलिसांना याची माहिती द्यावी असे आवाहन पोलिस उप आयुक्त चंद्रकांत खांडवी यांनी केले आहे.