नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
कल्याण/प्रतिनिधी- आताच फेरीवाला शहर समितीची बैठक झाली आहे. कल्याण- डोंबिवली महापालिका हद्दीतील ज्या फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे त्यांच्या पुनर्वसनाकरीता हरकती सूचना यापूर्वी मागविण्यात आल्या होत्या. त्याला पुरेशी प्रसिद्धी न मिळाल्याने त्याला चांगला प्रतिसाद मिळालेला नाही. काही ठिकाणी वेडिंग झोन म्हणून ही संकल्पना राबविली जाणार आहे. त्यामध्ये जे आरक्षित भूखंड आहे. त्यामध्ये वेडिंग झोन जाहीर करायला पाहिजेत. जेणेकरुन ज्या ठिकाणी बाजार आहे तो देखील खुला राहिल. काही नागरीकांची मागणी आहे.
वेळेची बचत व्हावी याकरीता घराच्या जवळच बाजार असावा. त्यादृष्टीने नियोजन करत आहे. आता येत्या दोन आठवड्यात पुन्हा हरकती सूचना मागविण्यात येणार आहेत. त्यानंतर फेरीवाल्यांचे पुनर्वसन केले जाणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड यांनी दिली आहे.