नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम.
नाशिक/प्रतिनिधी– नाशिक पोलिसांच्या वतीने प्रथमच एका महिलेवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. महिलेचं वय ४५ आहे या महिलेच्या विरोधात उपनगर पोलीस ठाण्यात दहशत माजवणे, खंडणी मागणे विनयभंग सारखे खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देत पैसे उकळणे तसेच परिसरात दहशत निर्माण करणे यासारखे गंभीर गुन्हे या महिलेचे विरोधात दाखल होते.
या अनुषंगाने नाशिक पोलिसांनी ही कारवाई केली आहे. तर नाशिक मध्ये प्रथमच एका महिलेवर जिल्हा बंदी कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तर आत्ता पर्यंत ७० पेक्षा जास्त जणांवर तडीपाडची कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे गुन्हेगारांवर वचक बसणार आहे त्याचबरोबर नाशिक शहरात शांतता राहण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे. अशी महिती मोनिका राऊत पोलीस उपायुक्त झोन १ यांनी दिली आहे.