महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
Default Image ठाणे लोकप्रिय बातम्या

एफडीएच्या नवी मुंबई परिमंडळास अन्न सुरक्षा व मानदे प्राधिकरणाचा पाच लाखांचे पारितोषिक

नेशन न्यूज मराठी टीम.

ठाणे/प्रतिनिधी – केंद्र शासनाच्या ईट राईट इंडिया या उपक्रमाच्या ईट राईट चॅलेंजमध्ये सहभागी होऊन उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल ठाणे जिल्हा अन्न औषध प्रशासन कार्यालयाच्या नवी मुंबई परिमंडळ 2 या कार्यालयास पाच लाखांचे पारितोषिक जाहीर झाले आहे. जिल्हा अन्न व औषध प्रशासनाच्या परिमंडळ दोन च्या कौतुकास्पद कामगिरीबद्दल जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी सहआयुक्त एस.एस. देशमुख व त्यांच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

ठाणे अन्न व औषध प्रशासन कार्यालयाने नवी दिल्लीच्या अन्न सुरक्षा व मानदे प्राधिकरणाच्या ‘ईट राईट इंडिया’ या उपक्रमात सन २०२२ – २०२३ मध्ये सहभाग घेतला होता. यामधील अन्न सुरक्षेबाबत वेगवेगळ्या देश पातळीवरील ईंट राईट चॅलेंज या स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन, देश पातळीवरील सर्व शहरांच्या स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली, याबद्दल अन्न सुरक्षा व मानदे प्राधिकारणाने नवी मुंबई परिमंडळ ०२ या विभागास पाच लाखांचे पारितोषिक घोषित केले आहे. या उपक्रमात अन्न व औषध प्रशासन ठाणे कार्यालयाने त्यांच्या कार्यक्षेत्रातील अन्न आस्थापनांना ईट राईट कॅम्पस, हायजिन रेटिंग प्राप्त करुन घेण्यास मार्गदर्शन केले.

अन्न परवाना व नोंदणीधारकांची संख्या वाढविण्यासाठी विशेष मोहिमा राबविल्या. अन्न व्यावसायकांसाठी प्रशिक्षण सत्र आयोजित केले. उच्चजोखिम (हायरिक्स) अन्न पदार्थाचे नमुने विश्लेषणासाठी घेऊन निरीक्षण मोहिमा राबविल्या. आहारात तृणधान्याचे महत्वाविषयी जन जागृती करण्यासाठी कार्यशाळा घेतल्या. शालेय जीवनातील विद्यार्थ्यांना पोषक आहाराचे महत्व समजण्यासाठी ईट राईट स्कूल ही संकल्पना राबविली. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांसाठी वर्कशॉप आयोजित केले. तसेच ठाणे जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी पर्यवेक्षिकांसाठी फोर्टिफाईड फुड व तृणधान्यावर आधारित पाककलेसंदर्भात प्रशिक्षण व प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले होते.ठाणे जिल्ह्यात “आज पासून तेल, मिठ व साखर कमी वापर” तसेच फोर्टिफाईड फुड, तृण धान्याचे आहारातील महत्व, वापरलेल्या खाद्य तेलाचा पुर्नरवापर टाळणे इत्यादी बाबत कार्यालयाच्या वतीने व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात आली.

या विविध उपक्रमाची केंद्रीय पातळीवर दखल घेऊन प्राधिकरणाने नवी मुंबई परिमंडळास पाच लाखांचे पारितोषिक जाहीर केले आहे. ठाणे अन्न व औषध प्रशासन कार्यालयाचे सह आयुक्त एस. एस. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त तथा नोडल अधिकार अ.घि.पारधी, अन्न सुरक्षा अधिकारी रा.रा. ताकाटे व अन्न सुरक्षा अधिकारी दि.स हरदास यांनी विशेष परिश्रम घेतले. ठाणे अन्न व औषध विभागाच्या या विविध उपक्रमाबद्दल व त्यांना जाहीर झालेल्या पारितोषिकाबद्दल जिल्हाधिकारी श्री. शिनगारे यांनी विभागाचे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×