मुंबई/ प्रतिनिधी- कोरोनाच्या उपचारासाठी आवश्यक असलेले रेमडेसिवीर या औषधाचा पुरवठा सुरळीत व्हावा तसेच त्याचे उत्पादन कसे वाढवता येईल याची पाहणी करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी विविध औषध निर्मिती कंपन्यांना प्रत्यक्ष भेट दिली आहे. कंपनीने उत्पादनात वाढ करावी, दर्जेदार औषधे रुग्णांना उपलब्ध व्हावीत यासाठी उत्पादकांनी प्रयत्नशील रहावे, असे आवाहनही डॉ.शिंगणे यांनी या कंपन्यांना केले आहे.
राज्यात कोरोनाचे संकट वाढत आहे व त्यावर उपचारासाठी आवश्यक असलेले रेमडेसिवीर या औषधाचा तुटवडा भासत आहे. या औषधाचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी त्याचे उत्पादन कसे वाढवता येईल या अनुषंगाने डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी तारापूर MIDC तील मे.कमला लाईफ सायन्सेस या उसनवारी परवान्यावर काम करणाऱ्या कंपनीस भेट दिली व कंपनीच्या उत्पादन क्षमतेचा व प्रत्यक्ष होत असलेल्या उत्पादनाचा आढावा घेतला. कंपनी दर दिवशी 35000 रेमडेसिवीर वायल्स (vials) ची निर्मिती करत असून कंपनीने आतापर्यंत 6 लाख वायल्सची निर्मिती केली आहे, त्यातील 4 लाख वायल्स सिप्ला कंपनीस दिल्या व सुमारे 2 लाख वायल्स पॅकिंगच्या प्रक्रियेत आहेत, असे कंपनीचे चेअरमन डॉ. झंवर यांनी सांगितले.
या कंपनीची रेमडेसिवीर liquid injection व lyophilized injection निर्माण करण्याची एकत्रित क्षमता 2 लाख वायल्स दर दिवस इतकी आहे.मे. कमला लाईफ सायन्सेस ही इंजेक्शन निर्मिती करणारी देशातील सर्वात मोठी कंपनी असून, ती त्यांच्या क्षमतेच्या 10 टक्के उत्पादन सिप्लासाठी करते व उर्वरित इतर औषधांच्या उत्पादन कंपन्यांसाठी करते.कंपनी जुबिलेंट, हेटेरो, डॉ.रेड्डीज इ. यांचेसाठीही रेमडेसिवीर इंजेक्शन उत्पादन करणार असल्याचे डॉ. झंवर यांनी सांगितले.
सिप्ला कंपनीचा रेमडेसिवीर injection साठी लागणारा API (Active pharmaceutical ingredients) त्यांचेकडे असून ते liquid injection च्या 35000 च्या 3 बॅचेस व lyophilized injection ची एक बॅच तयार करू शकतात. उत्पादनासाठीचा सहायक घटक Betadex आयात केला जातो, त्याची कमतरता असल्याने त्याचा परिणाम उत्पादनावर होत असल्याचे डॉ. झंवर यांनी सांगितले. घटक पुरेशा प्रमाणात उपलब्ध झाल्यास अधिक उत्पादन करता येईल व रेमडेसिवीरचा तुटवडा निर्माण होणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
त्यानंतर डॉ.शिंगणे यांनी तारापूर MIDC येथिल मे.नेप्रड प्रा. लि. या कंपनीस भेट दिली. ही कंपनी डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज या कंपनीसाठी रेमडेसिवीर इंजेक्शन (lyophilized) उसनवार परवान्यावर निर्माण करते. त्यांची पहिली बॅच 12 मे, 2021 रोजी बाजारात येईल. त्यांची रेमडेसिवीर lyophilized निर्माण करण्याची क्षमता 15000 वायल्स प्रतिदिन व liquid injection ची क्षमता 12000 वायल्स प्रतिदिन आहे.
Lyophilized injection च्या पहिल्या बॅचच्या 4 दिवसानंतर दुसरी बॅच घेता येते. Sterility testing साठी 14 दिवस लागतात. हैदराबाद येथील प्रयोगशाळेत express sterility टेस्टिंगची परवानगी मिळाल्यास टेस्टिंग 2 दिवसात करता येईल व 6 दिवसात बॅच release करता येईल.तसेच liquid Inj. ची बॅच दररोज उत्पादन करुन चाचणी हैद्राबाद येथे केल्यास तिसऱ्या दिवशी बॅच Release करता येईल, अशा प्रकारे राज्यात रेमडेसिवीरचे उत्पादन वाढविता येईल व मागणी पूर्ण करता येईल, असेही दोन्ही उत्पादक कंपन्यांकडून सांगण्यात आले.या भेटीत शासन व अन्न व औषध प्रशासनाकडून सर्व प्रकारचे सहकार्य करण्यात येईल असे आश्वासन डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी दिले आहे.
Related Posts
-
अन्न व औषध प्रशासनाची ठाणे शहरातील पनीर उत्पादकांवर कारवाई
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे / प्रतिनिधी - जिल्ह्यातील दूध…
-
मागासवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीअर्ज व नुतनीकरणासाठी मुदतवाढ
नेशन न्युज मराठी टीम. ठाणे- अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे…
-
डॉ.बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व अनुसंधान केंद्रात ६१५ खाटांचे रुग्णालय व नवीन पदव्युतर अभ्यासक्रम सुरु होणार
मुंबई/प्रतिनिधी - नागपूर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व अनुसंधान केंद्रात…
-
अन्न व औषध प्रशासनाच्या छाप्यात दीड कोटी रुपयांचा खाद्यतेल साठा जप्त
मुंबई प्रतिनिधी- अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने नुकतेच मुंबई…
-
डोमेसाईल दाखल्यावरील INDIA व Citizen of india ही अक्षरे मोठी व गडद करण्याची मागणी
प्रतिनिधी. सोलापूर - सेतू मधून देण्यात येणार्या डोमेसाईल दाखल्यावरील INDIA…
-
बोधिसत्व महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन
भारतीय_राज्यघटनेचे_शिल्पकार_विश्वरत्न_बोधिसत्व महामानव डॉ_बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण_दिनानिमित्त_महामानवास नेशन न्युज…
-
गर्भपाताची औषधे ऑनलाईन विक्री करणाऱ्या ॲमेझॉन विक्रेत्यावर अन्न व औषध प्रशासनाची कारवाई
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - इंटरनेटच्या माध्यमातून ऑनलाईन पोर्टलवर…
-
मऱ्हाटी’ महाराष्ट्र एम्पोरियममध्ये गणेशमूर्तींचे प्रदर्शन व विक्री
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - महाराष्ट्र लघु…
-
लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे ग्रामीण विकास व संशोधन समिती मार्फत पदवी व पदविका अभ्यासक्रम राबविण्यात येणार
मुंबई/प्रतिनिधी - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील अनेक वर्षे केवळ कागदावर…
-
मुंबईतून तीन लाख रुपये किमतीचे भेसळयुक्त तूप जप्त,अन्न व औषध प्रशासन बृहन्मुंबई यांची कारवाई
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - दिवाळीच्या तोंडावर अन्न व औषध…
-
हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमासाठी आवाहन
प्रतिनिधी. औरंगाबाद - भारतीय हातमाग तंत्रविज्ञान संस्थेतील सन 2020-21 या…
-
भेंडी दिन व भेंडी लागवड प्रशिक्षण संपन्न
कल्याण प्रतिनिधी - कल्याण तालुक्यामध्ये मौजे पोई येथे तालुका कृषी अधिकारी कल्याण यांचे मार्फत भेंडी दिन व शेतकरी प्रशिक्षणनुकतेच…
-
ठाण्यातील बिकानेर स्विट्सवर अन्न व औषध प्रशासनाची कारवाई,व्यवसाय बंद करण्याचे दिले आदेश
नेशन न्यूज मराठी टिम. ठाणे/प्रतिनिधी - ठाणे परिसरातील घोडबंदर रोड…
-
पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयात विविध जागांसाठी भरती
पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयात विविध जागांसाठी भरतीTeam DGIPR द्वारापदाचे नाव – जतन…
-
तृतीयपंथीय व्यक्तींना प्रमाणपत्र व ओळखपत्रासाठी राष्ट्रीय पोर्टल सुरु
मुंबई/प्रतिनिधी - सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, नवी दिल्ली यांचेकडून तृतीयपंथीय…
-
आंतरराज्य बनावट औषध खरेदी व विक्री करणाऱ्यांवर कारवाई
मुंबई/प्रतिनिधी - अन्न व औषध प्रशासनाने आंतरराज्य बनावट औषध खरेदी व…
-
एक कोटीचा गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थ जप्त, अन्न व औषध प्रशासनाची भिवंडीत कारवाई
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - अन्न व औषध प्रशासनाने…
-
महाप्रित व आय.आय.टी. मुंबई यांच्यात कार्बन कॅप्चरिंग व ग्रीन हायड्रोजन तंत्रज्ञानाबाबत सामंजस्य करार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा…
-
आदिवासी आश्रम शाळा व कर्मचारी यांचे आंदोलन
मुंबई / प्रतिनिधी - आदिवासी विकास आश्रम शाळा आणि…
-
भेसळयुक्त चहा पावडर जप्त अन्न व औषध प्रशासनाची कारवाई
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - शिवडी परिसरातील एका व्यापाऱ्याकडून भेसळयुक्त…
-
बुद्धिस्ट यूथ ऑफ कल्याण सिटी आयोजित डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची ऑनलाइन जयंती व स्पर्धा
कल्याण प्रतिनिधी - करोना महामारीने संपूर्ण जगात थैमान घातले आहे.या…
-
३० व ३१ ऑक्टोबरला एमपीएससी परीक्षार्थी व परीक्षेचे काम पाहणाऱ्यांना लोकल ट्रेनने प्रवास करण्याची मुभा
मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी)परीक्षा 31 ऑक्टोबर 2021 रोजी…
-
राजधानीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी
नवी दिल्ली/ प्रतिनिधी - भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब…
-
अन्न व्यवसायिकांसाठी अन्न व औषध प्रशासना कडून कार्यशाळेचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे - अन्न व औषध प्रशासन…
-
ठाणे जिल्ह्यात तंबाखु व तंबाखुजन्य पदार्थाचे सेवन व विक्रीस बंदी
ठाणे- (संघर्ष गांगुर्डे) जिल्ह्यामध्ये तंबाखु व तंबाखुजन्य धुम्रपानाचे पदार्थ इत्यादीची…
-
कल्याणात प्लास्टिक वापरुन इंधनाची निर्मिती
प्रतिनिधी. कल्याण- रुद्र इन्व्हारमेंन्ट सोलुशन लिमीटेड आणि महानगरपालिका यांच्या संयुक्त…
-
भेसळयुक्त दुध व खव्याच्या साठ्यावर अन्न औषध प्रशासन विभागाची कारवाई
नेशन न्यूज मराठी टीम. बीड / प्रतिनिधी - दुध व…
-
सार्वजनिक औषध चाचणी प्रयोगशाळांना विहित नमुन्यात अहवाल देण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - सार्वजनिक औषध चाचणी प्रयोगशाळांना अन्न…
-
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागतर्फे अनुसूचित जाती, इमाव, विजाभज व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांना आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - सामाजिक न्याय व विशेष…
-
अन्न व औषध प्रशासनाच्या छाप्यात निकृष्ट दर्जाचा तेल साठा जप्त
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई- अन्न व औषध प्रशासनाच्या बृन्हमुंबई…
-
दहावी व बारावीच्या परीक्षेसंदर्भात मुंबई विभागासाठी नियंत्रण कक्ष व हेल्पलाईन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - फेब्रुवारी-मार्च 2023 मध्ये घेण्यात…
-
राष्ट्रीय क्रीडा व साहसी पुरस्कार प्रदान,महाराष्ट्रातील ११ खेळाडू व ३ संस्थांचा समावेश
नवी दिल्ली/प्रतिनिधी - केंद्रीय युवा कल्याण तथा क्रीडा मंत्री अनुराग…
-
अन्न व औषध विभागाचे अधिकारी भासवून पाच लाखाची खंडणी मागणारे जेरबंद
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. जळगाव/प्रतिनिधी - चोपडा शहरात आज…
-
नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुका स्थगित
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात…
-
औषधांची आक्षेपार्ह जाहिरात करणाऱ्यांना दंड, अन्न व औषध प्रशासनाची कायदेशीर कारवाई
मुंबई/प्रतिनिधी - औषधे व जादुटोणादी (आक्षेपार्ह जाहिराती ) कायदा १९५४…
-
डॉ.होमी भाभा राज्य विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ.रजनीश कामत यांची नियुक्ती
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - राज्यातील पहिले समूह विद्यापीठ…
-
प्रवाशांना कोल्ड्रींक्स मध्ये गुंगीचे औषध टाकून लूटणाऱ्या चोरास रेल्वे पोलिसांनी ठोकल्या बेडया
कल्याण प्रतिनिधी - कोल्ड्रिंक्स गुंगीचे औषध टाकून प्रवाशांना लूटणा:या चोराला…
-
औषधावरील आक्षेपार्ह जाहिरातप्रकरणी ४८ लाखांचा साठा जप्त अन्न व औषध प्रशासनाची कारवाई
मुंबई/प्रतिनिधी - “मायफेअर क्रिम” चे उत्पादक झी लॅबोरटरीज लि., पोआंटा साहिब, हिमाचल प्रदेश…
-
पेढ्यात गुंगीचे औषध टाकून लुटणाऱ्या दोघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - प्रवाशी बनून रिक्षात बसल्यानंतर…
-
भूदान व ग्रामदान जमिनींसाठी अभ्यास समिती नियुक्त
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - राज्यातील भूदान व ग्रामदान…
-
अन्न व औषध प्रशासनाची कारवाई,कमी दर्जाचा फूड सप्लिमेंट साठा जप्त
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई - अन्न व औषध प्रशासनाने…
-
डोंबिवली पेंढारकर कॉलेज व घरडा सर्कल परिसरात प्रायोगिक तत्वावर सम विषम व नो पार्किंग
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील…
-
थकीत वीजबिल न भरल्याने छ.संभाजीनगरच्या अन्न व औषध संकुलाचा वीजपुरवठा खंडीत
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. संभाजीनगर/प्रतिनिधी - छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील…
-
मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय व एशियाटिक सोसायटीतील दुर्मिळ ग्रंथ व हस्तलिखित होणार डिजिटल
मुंबई/प्रतिनिधी - मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयातील दुर्मिळ ग्रंथ व हस्तलिखितांचे आणि…
-
राजधानीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - प्रख्यात न्यायशास्त्रज्ञ ,अर्थशास्त्रज्ञ, तत्वज्ञ, समाजसुधारक…
-
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई, २९ कोटीचे भेसळयुक्त अन्न पदार्थ जप्त
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - अन्न व औषध प्रशासनामार्फत…
-
हरियाणा, दिल्ली-एनसीआरमधील औषध उत्पादक आणि वितरकांवर इन्कम टॅक्सच्या धाडी
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - औषध उत्पादन आणि…
-
अतिवृष्टी व पूरग्रस्तांसाठी १० हजार कोटींचे अर्थसहाय्य
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील अतिवृष्टी व पुरामुळे शेती पिकाच्या झालेल्या नुकसानीपोटी…