महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
Default Image आरोग्य लोकप्रिय बातम्या

जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या पॅथॉलॉजी विभागावर अन्न व प्रशासन विभागाचा छापा,एक्सपायर औषधी किटचा होत होता वापर

नेशन न्यूज मराठी टिम.

जळगाव/प्रतिनिधी – जिल्हाधिकारी यांच्याकडे आलेल्या तक्रारीवरून अप्पर जिल्हाधिकारी अर्पित जी चव्हाण अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ.अनिल जी माणिकराव , औषध निरीक्षक सो बा मुळे यांनी आज सकाळी 11 वाजेच्या दरम्यान जळगाव शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात छापा टाकला आहे.  या कारवाईने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. 

दिनांक१०-०८-२०२३ रोजी मा. जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी स्वरूपात तक्रार आलेली होती की शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील पॅथॉलॉजी लॅब येथे रुग्णाच्या शरीरावरील गाठीचे निदान होण्यासाठीचे किट हे जुलै २०२२ पासुन एक्सपायर असून गेल्यावर्षभरापासून सदर किट द्वारेच रुग्णांच्या गाठीचे निदान केले जात आहे व रुग्णांच्या जीवाशी खेळले जात आहे. असा आरोप तक्रार पियुष पाटील यांनी केला आहे.

प्रथमदर्शनी १० किट (१ का किट मध्ये  २५० किट मधे प्रि एजंट/ किट सॅम्पल २५०×१०=२५००)  रुग्णांच्या गाठीचे निदान करण्यासाठी हे वापरण्यात आले असल्याचे दिसून येत आहे. या सोबतच इतर विविध गंभीर आजारा वरील औषधी देखील एक्सपायर वापरत असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. तसेच कोविड काळातील महत्त्वपूर्ण औषधी देखील एक्सपायर वापरण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. सदर एक्सपायर औषधी ह्या तीन महिन्याच्या आत डीस्पोस/ नष्ट करणे गरजेचे असताना देखील हे चालू स्टॉक मध्ये आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. 

तक्रारीनुसार अप्पर जिल्हाधिकारी अर्पित चव्हाण, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. अनिल माणिकराव आणि इतर अधिकाऱ्यांनी महाविद्यालयाच्या पॅथॉलॉजी विभागात येऊन भेट दिली.

सदरहू त्यांनी तक्रारीच्या अनुषंगाने सविस्तर माहिती घेतली आहे. तक्रारीच्या अनुषंगाने कुठल्याही प्रकारची भीषणता नसल्यामुळे यात  घाबरण्यासारखे कुठलेही कारण नाही,  अशी प्रतिक्रिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे विकृतीशास्त्र (पॅथॉलॉजी) विभाग प्रमुख डॉ. दीपक शेजवळ यांनी दिली आहे.त्याच बरोबर शासनाकडे सतत मागणी करून औषधांचा पुरवठा. वेळेवर होत नसल्याची माहिती यावेळी मिळाली

एन ए बी एल नुसार एक्सपायरी संपलेल्या किटचा दर्जा जर उत्तम असेल तर त्याची विश्वसनीयता लक्षात घेऊन आपण त्याचा पुनर्वापर करू शकतो. मुलांना प्रॅक्टिकल शिकवण्यासाठी तसेच नमुन्यांचे निदान करण्यासाठी त्याचा वापर करण्यात आलेला आहे. अशी माहिती शासकीय महाविद्यालयाच्या वतीने देण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×