महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
Default Image चर्चेची बातमी महाराष्ट्र

कोरोनाचे नियम पाळत सोलापूर जिल्ह्यातील शाळांची अखेर घंटा वाजली

सोलापूर/अशोक कांबळे – कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून बंद असलेल्या शाळांची बेल वाजली असून शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करीत सोलापूर जिल्ह्यातील कोरोनामुक्त झालेल्या गावातील 335 शाळा सुरू झाल्या आहेत.शाळा सुरू करण्याच्या सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पत्रकार परिषदेत दिल्या होत्या.जिल्ह्यातील अनेक शाळा शासनाने कोविडच्या संशयित रुग्णाच्या विलगिकरणासाठी वापरल्या होत्या. त्यामुळे त्या सॅनिटाइझ करण्यात आल्या.शाळा गेल्या दीड वर्षांपासून बंद असल्याने वर्गांची साफसफाई करण्यात आली.शाळा सुरू झाल्याने ऑनलाइन सुरू असलेल्या वर्गाला काही प्रमाणात थांबा मिळाला आहे.

ऑनलाइन शिक्षणात सर्व विद्यार्थ्यांकडे मोबाईल होते असे नव्हते.ज्यांच्याकडे होते त्यांना नेटवर्कची अडचण येत होती तर काही विद्यार्थ्यांना शिकवलेले समजत नव्हते.बरेच विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणापासून पळ काढत असत.सोलापूर जिल्ह्यातील शाळा सुरू झाल्याने पालकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. असे असले तरी जिल्ह्यातील सर्व शाळा सुरू झाल्या नाहीत.ज्या गावात गेल्या एक महिन्यापासून कोरोनाचे रुग्ण सापडले नाहीत अशा गावातील शाळा सुरू झाल्या आहेत.

जिल्ह्यातील शाळा सुरू झाल्या असून शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांत उत्साह पहायला मिळाला.मोहोळ तालुक्यातील 26 शाळा सुरू झाली असून येण्याऱ्या काही दिवसात सर्व शाळा सुरू होतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे.मोहोळ तालुक्यातील मलिकपेठ येथील राजनजी पाटील विद्यालयामध्ये शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थी उत्साहात दाखल झाले.शिक्षकांनी मुलांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य त्या सूचना देऊन शाळा प्रशासनाने मुलांचे हात सॅनिटाइझ केले.यावेळी मुलांचे तापमान तपासून त्याची नोंद करण्यात आली.मुलांना मास्क,सॅनिटाइझ बाटलीचे वाटप करण्यात आले.

यावेळी शाळेतील शिक्षकांनी मुलांना गुलाब पुष्प देऊन देऊन स्वागत केले.मुलांनी व शिक्षकांनी मास्कचा वापर करीत शिक्षणाला सुरुवात केली.यावेळी वर्गात योग्य ते अंतर ठेवत मुले प्रत्यक्ष शिक्षणाचे धडे गिरवू लागले आहेत.यावेळी शाळेत मुलांचे स्वागत शाळेचे मुख्याध्यापक भालचंद्र जाधव,कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती नागेश साठे,केंद्र प्रमुख अप्पा देशमुख,संस्थेचे सचिव विजयकुमार चांदणे, शिक्षक हणमंत कोकरे,सावकार कारंडे,ठाकरे,नागटीळक,डोंगरे,आवारे, भारत कादे,सुनील कादे,पटू हजारे आदीनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×