नेशन न्यूज मराठी टीम.
नागपूर/प्रतिनिधी – नागपूर शहरात काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे सखल भागांत पाणी साचले. तसेच अनेकांच्या घरातही पाणी शिरल्याचं पहायला मिळालं.काल सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे नागपूर शहरातील अनेक सखल भागांत पाणी साचले .
रस्त्यांवर चक्क गुडघाभर पाणी साचल्याचं पहायला मिळत आहे.काल सकाळपासूनच संततधार पाऊस सुरू आहे. गेल्या २४ तासात जिल्ह्यात अतिवृष्टी झाली.नागपूर जिल्हयात १०६.४३ मि.मी. सरासरी पावसाची नोंद झाली आहे.नागपूरात अनेक ठिकाणी पाण्यामुळे लोक अडकलेले आहेत महापालिका कर्मचारी त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत आहे.