नेशन न्यूज मराठी टीम.
डोंबिवली/प्रतिनिधी – ५ ऑक्टोबर रोजी या एका संस्थेच्या कार्यालयात बांग्लादेश हून एक ईमेल आला. या ईमेल मध्ये एका १९ वर्षाच्या मुलीला नोकरी लावण्याचा बहान्याने बांग्लादेश हून भारतात आणले असून ती मुलगी डोंबिवलीत असून तिला वेश्याव्यवसाय करण्या भाग पाडत असल्याची माहिती देण्यात आली होती.या घटनेचे गांभीर्य ओळखून संस्थेच्या पदाधिकारी शिल्पा वानखेडे यांनी आपल्या काही सहकाऱ्यांसोबत पुण्याहून ठाणे गाठले.ठाण्याला येऊन त्यांनी ठाण्यात अँटी ह्यूमन ट्राफिकिंग सेलच्या अधिकाऱ्यांची भेट घेत सदर माहिती त्यांना दिली.माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश पाटील,यांही स्थानिक मानपाडा पोलीस ठाण्याच्या मदतीनेडोंबिवलीतील हेदूटणे गावाजवळ पोलिसांनी छापा टाकला.
या वेळी काही जणाला पोलिसांनी ताब्यात घेत चौकशी सुरू केली.तपासा दरम्यान पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली की काही आरोपीनी बांग्लादेशातील महिलांना नोकरी व उपचाराचे आमिष दाखवून त्यांना बांग्लादेश मधून भारतात आणले होते.या मुलींसोबत आधी त्यांनी लैंगिक अत्याचार केला नंतर या मुलींना जबरदस्तीने देहव्यापारात ढकलण्यात आले.देह व्यापारास नकार देणाऱ्या मुलींना मारहाण देखील केली जात होती .
मानपाडा पोलिसांनी लागलीच कारवाई करत युनूस शेख उर्फ राणा , साहिल शेख, फिरदोस सरदार, आयुब शेख, बीपलॉप खान या पाचही दलालांना बेड्या ठोकल्या आहेत. विशेष म्हणजे या आरोपीने या महिलासाठी डोंबिवलीत भाड्याने घर घेत घर मालकाच्या मदतीने भारतीय असलेले दस्तावेज बनवले होते.
या महिलांना महाराष्ट्रातील अनेक लॉजिंग आणि बोर्डिंग मध्ये वेश्या व्यवसाय करण्यासाठी पाठवत होते सध्या पोलिसांनी या आरोपीसह त्या घरमालकाला देखील अटक केली आहे. कोणत्याही भाडेकरूला घर देताना पोलीस स्थानकात माहिती द्यावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.