प्रतिनिधी.
डोंबिवली – देशाच्या ७२ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त डोंबिवली शहरातील दत्त नगर चौक येथे १५० फूट उंचीचा सर्वात मोठा झेंडा फडकवण्यात आला. संपूर्ण डोंबिवली शहर ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम’, या घोषणेने दुमदुमले होते. काहीच्या डोळ्यात आसवे तरळली होती. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, कल्याण डोंबिवली पालिकेचे आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांच्या हस्ते हा झेंडा फडकवण्यात आला.या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी डोंबिवलीकरांनी गर्दी केली होती.शिवसेनेचे नगरसेवक राजेश मोरे , माजी नगरसेविका भारती मोरे यांच्या पुढाकाराने दत्तनगर येथे हा कार्यक्रम पार पडला.यावेळी देशभक्तीपर गीते, लेझिम या कलांचे सादरीकरण करण्यात आले. या कार्यक्रमास महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, पोलीस आयुक्त विवेक पानसरे, शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, आयोजक आाणि डोंबिवली शिवसेना शहर प्रमुख राजेश मोरे तसेच नगरसेवक शिवसेना पदाधिकारी आणि समस्त डोंबिवलीकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.