प्रतिनिधी.
कल्याण – मटका चालविणारा जिग्नेश ठक्कर उर्फ मुन्ना याची शुक्रवारी (३१ जुलै) रात्री कल्याण रेल्वे स्थानक परिसरात फिल्मी स्टाईल ने गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. आरोपी कार मध्ये येऊन तीन चार जण असल्याचे बोलले जात आहे आपल्या कार्यालयातून घरी जाताना हल्लेखोरांनी जिग्नेश वर गोळीबार केला. जिग्नेश ठक्करवर गोळीबार करणारे धर्मेश उर्फ नन्नू शहा , जयपाल उर्फ जापान व इतर दोन अनोळखी शोधा पाच पोलीस पथके रवाना करण्यात आले आहे
मयत जिग्नेश ठक्कर याचे ठाणे, कल्याण, उल्हासनगर परिसरात अनेक ठिकाणी मटका आणि पत्त्यांचे क्लब आहेत. शिवाय तो क्रिकेट मॅचवरही सट्टा घेत असल्याची माहिती आहे. जिग्नेश शुक्रवारी रात्री कल्याण स्टेशन परिसरातील नीलम गल्लीत मधील सुयश प्लाझा मधील ऑफिस बाहेर फोन वर बोलताना आरोपी धर्मेश उर्फ नन्नू शहा आणि त्याचा डायव्हर जयपाल , आणि दोन अनोळखी इसमाने रिव्हलर ने छातीवर आणि पोटावर पाच राऊंड गोळ्या झाडल्या आणि परिसरातील नागरिक मदतीला धावल्या नंतर कोणी मध्ये आल्यास गोळ्या घालुन ठार करू अशी धमकी देत घटनास्थळा वरून पोबारा केला आरोपी आणि मयत दोघे मित्र होते त्यांच्यावर अनेक गुन्हे पोलीस ठाण्यात आहे, मटका जुगार , घोडी जुगार , क्लब असे अनेक धंदे परिसरात सुरू होते .दोन दिवसांपूर्वी कल्याण पश्चिमेतील बाजारपेठ पोलीस ठाण्यातील हद्दीतील शंकर राव चौक येथे नन्नू शहाचा मित्र चेतन पटेला मयत जिग्नेश ठक्कर उर्फ मुनिया याचा कडून शिवीगाळ आणि मारहाण झाली होती. त्या प्रकरणात परस्पर दोघांवर गुन्हे दाखल झाली होते. यांच्यात काही आर्थिक वाद होते धंद्यात जिग्नेश ठक्कर मोठे यश मिळालं होते त्यामुळे नेहमीच दोन गटात खटके उडत असतं
दरम्यान त्याच्या छातीत चार गोळ्या झाडण्यात आल्या. या घटनेनंतर जिग्नेशला कल्याणच्या फोर्टिस हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, मात्र तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात नन्नू शहा , जयपाल आणि दोन अनोळखी इसमावर भादवी कलम, ३०२, ३४, ५०६(२) आणि भारतीय हत्यार कायदा ३,२५, सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१)३५, अन्वेय गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.पुढील तपास पोलीस करत आहे.