नेशन न्यूज मराठी टीम.
जळगाव /प्रतिनिधी – चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार मध्य प्रदेश भागाकडून चोपड्याकडे काही इसम गावठी कट्टा घेऊन येत असल्याचे समजले होते. तातडीने लासुर सत्रासेन रोडावरील घाटावर नाकेबंदी करत लक्ष्मण शिंगाने, राकेश पाटील, किशोर शिंदे यांना सदर घटनेची माहिती दिल्याने त्यांनी येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची तपासणी केली.
यामध्ये सुझुकी कंपनीची चार चाकी वाहनातून येणाऱ्या इसमांची तपासणी केली असता त्या वाहनांमधील इसमांचे वर्तन संशयकारक आढळून आल्याने त्यांची सखोल तपासणी केली. त्यात त्यांच्याजवळ दोन गावठी कट्टा व पाच जिवंत काडतूस मिळाले. चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन येथे पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाहनासह दोन गावठी कट्टा व पाच जिवंत काडतूस असे एकूण साडेतीन लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. पोलीस उपविभागीय अधिकारी ऋषिकेश रावले यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पोलीस स्टेशनचे अधिकारी याचा पुढील तपास करत आहेत.