महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image महत्वाच्या बातम्या यशोगाथा

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी महाराष्ट्रातील पाच बालकांची निवड

प्रतिनिधी.

नवी दिल्ली – महाराष्ट्राचे गुणवान बालक कामेश्वर वाघमारे, काम्या कार्तिकेयन,अर्चित पाटील, सोनित सिसोलेकर आणि श्रीनभ अग्रवाल यांना विविध क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार जाहीर झाला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज या बालकांसोबत दूरदृष्य प्रणालीद्वारे संवाद साधला व त्यांना मार्गदर्शन केले.

केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाच्यावतीने विविध क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी  देशातील  32 बालकांची   ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार  २०२१’ साठी निवड केली. यात महाराष्ट्रातील नांदेड येथील कामेश्वर वाघमारे (14), मुंबई येथील काम्या कार्तिकेयन (13), जळगाव येथील अर्चित पाटील(14), पुणे येथील सोनित सिसोलेकर(13) आणि नागपूर येथील श्रीनभ अग्रवाल(16) या बालकांचा समावेश आहे.  पदक, 1 लाख रूपये  आणि  प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

नांदेड येथील कामेश्वर  वाघमारे याची शौर्य श्रेणीत या मानाच्या पुरस्कारासठी निवड झाली. मनार नदित पोहायला गेले असता बुडणाऱ्या दोन मुलांना स्वत:च्या जीवाची पर्वा न करता कामेश्वरने त्यांचा जीव वाचविला आहे.

मुंबई येथील काम्या कार्तिकेयन हिची क्रीडा श्रेणीत निवड झाली. 13 वर्षीय पर्वतारोही काम्या कार्तिकेयन ही मिशन साहस या विशेष मोहिमेंतर्गत काश्मिर मध्ये विशेष प्रशिक्षण घेत असून तिला एक्सप्लूरस ग्रँडस्लॅम सर करून जगातील सर्वात कमी वयाची पर्वतारोही म्हणून देशाचे नाव उंचवायचे आहे.

अर्चित पाटील याची नव संशोधन श्रेणीत निवड झाली आहे. साधारण यंत्रांचा उपयोग करून अर्चित याने तयार केलेल्या उपकरणाद्वारे बाळंतपणात होणाऱ्या रक्तस्त्रावाची अचूक माहिती जाणून घेता येते.

पुणे येथील सोनित सिसोलीकर याची ज्ञानार्जन श्रेणीत निवड झाली असून  त्याने रेडिओलॉजीच्या प्रभावी परिणामावर संशोधनात्मक अभ्यास केला आहे. नासा या आंतरराष्ट्रीय संघटनेनेही त्याच्या कार्याचा गौरव केला आहे.

नागपूर येथील श्रीनभ अग्रवाल याची नवसंशोधन श्रेणीत निवड झाली आहे. श्रीनभ याने‍ पिकांवर येणाऱ्या यलो मोझॅक विषाणूला नष्ट करण्यासाठी कंबरमोडी या वनस्पतीच्या पानांपासून प्रभावी औषध तयार केली आहे.

Related Posts
Translate »