नेशन न्यूज मराठी टीम.
बुलढाणा/प्रतिनिधी – बुलढाणा जिल्ह्याच्या नांदुरा पोलीस स्टेशन हद्दीतील जळगाव जामोद नांदुरा रोडवर व्यापाऱ्यांच्या डोळ्यात मिरची पूड फेकून 3 लाख रुपये व किनगाव राजा पोलीस स्टेशन हद्दीतील दुसऱ्या व्यापाऱ्याच्या डोळ्यात मिरची पैसे लुटनाऱ्या दोन्ही प्रकरणातील पाच आरोपींना बेड्या ठोकण्यात बुलढाणा पोलिसांना यश आले आहे.
सध्या या गुन्हातील तीन आरोपी फरार आहेत. दरम्यान या पाच आरोपींकडून जवळपास साडेपाच लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. दोन्ही घटनेतील आरोपी हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहे. त्यांच्यावर यापूर्वी देखील गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.