Desk Marathi News

महत्वाच्या बातम्या

बनावट कागदपत्रांच्या आधारे चोरीच्या वाहनांची विक्री,९ जन गजाआड दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत
Default Image मुंबई लोकप्रिय बातम्या

मुंबईतील चक्रीवादळग्रस्त भागाची मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी केली पाहणी

मुंबई/प्रतिनिधी – राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री व मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी तोक्ते चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या मुंबईतील विविध किनारपट्टी ठिकाणांना भेट दिली. यावेळी त्यांनी मालाड-मढ, खारदांडा, माहिम व कुलाबा येथील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली व मच्छिमार बांधवांना दिलासा दिला.सोमवारी अरबी समुद्रात उसळलेल्या तोक्ते चक्रीवादळामुळे किनारपट्टी भागातील मच्छीमारांचे फार  नुकसान झालेले आहे. या नुकसानग्रस्त भागाची श्री.शेख यांनी अधिकाऱ्यांसह पाहणी केली.

यावेळी श्री. शेख म्हणाले की, या चक्रीवादळामुळे मच्छीमार नौका, जाळी व किनारपट्टीनजीकची घरे यांचे नुकसान झाले आहे. हवामान खात्याकडून तोक्ते वादळाची पूर्वसूचना मिळाल्यानंतर मच्छीमारांनी आपल्या नौका नांगरुन ठेवल्या होत्या. तरीही वादळाच्या तीव्रतेमुळे बोटींचे नुकसान झाले. झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येत आहेत. मुख्यमंत्री व अर्थमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर मदत जाहीर करण्यात येईल.यावेळी त्यांच्यासोबत आमदार भाई जगताप, मत्स्यव्यवसाय आयुक्त अतुल पाटणे, सह सचिव राजेंद्र जाधव, प्रादेशिक उपायुक्त कोकण विभाग श्री.देवरे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
X