Desk Marathi News

महत्वाच्या बातम्या

बनावट कागदपत्रांच्या आधारे चोरीच्या वाहनांची विक्री,९ जन गजाआड दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत
Default Image देश लोकप्रिय बातम्या

फिश अँड सीफूड – अ कलेक्शन ऑफ ७५ गौर्मे रेसिपीज ‘ पाककला कॉफी टेबल पुस्तकाचे प्रकाशन

नेशन न्यूज मराठी टीम.

नवी दिल्ली – केंद्रीय मत्स्यपालन आणि पशुसंवर्धन मंत्री  परशोत्तम रुपाला यांनी आज नवी दिल्लीत  ‘फिश अँड सीफूड – अ कलेक्शन ऑफ 75 गौर्मे  रेसिपीज ‘ या अनोख्या पाककला  कॉफी टेबल पुस्तकाचे  प्रकाशन केले.स्थानिक माशांच्या प्रजातींना लोकप्रिय करण्याबरोबरच मासे आणि माशांपासून  तयार केल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांना  चालना देण्यासाठी मत्स्यपालन , पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाच्या अंतर्गत मत्स्यपालन विभागाने हा उपक्रम हाती घेतला आहे. राज्यमंत्री  डॉ. एल. मुरुगन आणि डॉ. संजीव कुमार बल्यान या विभागाच्या  दोन्ही राज्यमंत्र्यांसह  सचिव जतींद्र नाथ स्वैन, सागर मेहरा, सहसचिव (अंतर्गत  मासेमारी ), जे बालाजी, सहसचिव (सागरी मासेमारी ), विभागाचे अन्य अधिकारी ,  प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेच्या कार्यक्रम व्यवस्थापन विभागाचे  सल्लागार आणि विशेष अतिथी सेलिब्रिटी शेफ  कुणाल कपूर यांच्या उपस्थितीत या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.स्वातंत्र्याचा  अमृत महोत्सव या मोहिमेअंतर्गत, कॉफी टेबल पुस्तक  आणि त्याचा प्रकाशन सोहळा हा देशात सुरू  असलेल्या भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 गौरवशाली वर्षांच्या  उत्सवाचा एक भाग आहे. या पाककला  पुस्तकात  देशांतर्गत पाणवठ्यांमध्ये उपलब्ध असलेल्या माशांची  विविधतता आणि देशभरातील वैविध्यपूर्ण पाककृती आणि पाककलेच्या पद्धतींचे  प्रतीक असलेला देशांतर्गत  माशांपासून तयार करण्यात येणाऱ्या  पाककृतींचा  वारसा यावर प्रकाश टाकण्यात आला आहे.

कॉफी टेबल पुस्तकाच्या प्रकाशन  समारंभात, या पुस्तकाची संकल्पना  मांडल्याबद्दल आणि भारतीय ‘पाककला ‘, विविध पारंपारिक मत्स्योत्सव आणि संस्कृती यांचे एकत्रित सार या पुस्तकाच्या माध्यमातून समोर आणल्याबद्दल रुपाला यांनी विभागाचे अभिनंदन केले.

या कॉफी टेबल पुस्तकाच्या  माध्यमातून, या विभागाने   देशांतर्गत माशांचा वापर वाढवण्याच्या आणि अन्न आणि पोषणाच्या सुरक्षेसाठी   प्रथिनांचा स्रोत असलेल्या माशांना  प्रोत्साहन देण्याच्या उद्दिष्टासह, स्थानिक पाककृती आणि भारतीय माशांच्या पोषक  आहाराचा   वारशाच्या विविधतेला प्रोत्साहन देण्याची संकल्पना मांडण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
X