महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
क्रिडा ताज्या घडामोडी

पॅरिस ऑलिम्पिक २०२४ साठी केंद्रीय क्रीडा मंत्र्याच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीची पहिली बैठक

नेशन न्यूज मराठी नेटवर्क.

नवी दिल्ली/प्रतिनिधी – केंद्रीय माहिती आणि प्रसारण, युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर आणि राज्यमंत्री निसिथ प्रामाणिक यांच्या अध्यक्षतेखाली पॅरिस ऑलिम्पिक 2024 साठी उच्चस्तरीय समितीची पहिली बैठक झाली. 

एमवायएएस, भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई) आणि भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे (आयओए)  प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. या बैठकीत पुढील वर्षी होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिकच्या आयोजनावर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच यावर्षी हांगझोऊ येथे होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या तयारीचा आढावाही घेण्यात आला.

“आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये आपल्या  खेळाडूंनी चांगली कामगिरी करावी तसेच भारताने यावर्षी हांगझोऊमध्ये सर्वोत्तम कामगिरी करावी यासाठी सतत प्रयत्न केले जात आहेत. आपले एमओसी (मिशन ऑलिंपिक सेल) सदस्य द्वि-साप्ताहिक बैठका घेत आहेत. प्रगतीवर देखरेख  आणि सर्वकाही नियोजनानुसार सुरु  असल्याची खातरजमा करण्यासाठी संघ नियमितपणे खेळाडूंच्या संपर्कात आहेत. आजच्या मूल्यांकन बैठकीत याचा आढावा 

घेण्यात आला. उपस्थित  सर्व भागधारकांनी, आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी असेल असा विश्वास व्यक्त केला. सरकार असो की क्रीडापटू, सर्वजण या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या तयारीत कोणतीही कसर राहू नये  याची काळजी घेत आहेत”  असे अनुराग सिंह ठाकूर यावेळी म्हणाले.

आशियाई क्रीडास्पर्धा या वर्षी 23 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर या कालावधीत चीनमधील हांगझोऊ येथे होणार आहेत, तर ऑलिम्पिक स्पर्धा पुढील वर्षी फ्रान्समध्ये पॅरिस इथे 26 जुलै 2024 ते 11 ऑगस्ट 2024 या कालावधीत होणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×