Desk Marathi News

महत्वाच्या बातम्या

बनावट कागदपत्रांच्या आधारे चोरीच्या वाहनांची विक्री,९ जन गजाआड दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत
Default Image मुख्य बातम्या व्हिडिओ

डोंबिवलीतील फडके रोडवरील लाकडी वस्तूच्या गोडाऊनला आग

डोंबिवली प्रतिनिधी – डोंबिवली पूर्वेच्या फडके रोडवरील इमारतीला लागून असणाऱ्या गोडाऊनला आग लागल्याची घटना आज सकाळी घडली. या आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसते तरी यामध्ये गोडाऊनमधील लाकडी वस्तू पूर्णपणे जळून खाक झाल्या. तर इमारतीमधील सर्व नागरिकांनी सुरक्षित स्थळी धाव घेतल्याने सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही.

डोंबिवली पूर्वेतील फडके रोडवर प्रियदर्शनी नावाची तळ अधिक 1 मजल्याची इमारत आहे. या इमारतीच्या आवारातच हे गोडाऊन असून त्यात नको असलेल्या लाकडी वस्तूंचे सामान ठेवण्यात आले होते. या सामानाला आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. लाकडी सामानामूळे क्षणार्धातच या आगीने रौद्ररूप धारण केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. तर या इमारतीमध्ये बँक, लॉंड्री आणि ज्वेलर्सची दुकाने होती. आग लागल्याचे समजताच पटापट नागरिकांनी आणि व्यापाऱ्यांनी ही दुकाने बंद करत सुरक्षित ठिकाणी धाव घेतली. तसेच इमारतीचा वीजपुरवठाही तातडीने बंद करण्यात आला. अग्निशमन दलाच्या डोंबिवली विभागातील 3 गाड्यांनी घटनास्थळी तातडीने धाव घेत अर्ध्या तासात आगीवर नियंत्रण मिळवले.
या आगीचे नेमके कारण समजू शकले नसले तरी या इमारतीच्या मागे असणाऱ्या झाडाच्या फांद्या जाळल्याने ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.

Translate »
X