Desk Marathi News

महत्वाच्या बातम्या

बनावट कागदपत्रांच्या आधारे चोरीच्या वाहनांची विक्री,९ जन गजाआड दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत
आरोग्य ताज्या घडामोडी

शॉक सर्किटमुळे पुन्हा शासकीय रुग्णालयात आग

नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम.

यवतमाळ/प्रतिनिधी – महाराष्ट्रातील शासकीय रुग्णालयात नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते ही बाब नित्याचीच झाली आहे. त्यातच वारंवार स्वच्छतेचा अभाव, रुग्णांना योग्य ती आरोग्य सेवा न मिळणे अशा असंख्य तक्रारी नेहमीच्याच झाल्या आहेत. रुग्णालयातील विद्युत यंत्रणांमध्ये शॉक सर्किट होऊन अनेक रुग्णांनी आपले प्राण गमावले आहे. त्यात मृत्युमुखी पडणाऱ्यांमध्ये काही लहान मुलं ही होती. तरीही गेंडयाची कातडी असलेल्या प्रशासनाला जाग येत नाही. त्यामुळे शासकीय रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय रुग्णालयात आग लागल्याची घटना घडली आहे. वैद्यकीय रुग्णालयात असलेल्या एसीचा अचानक स्फोट झाल्यामुळे आग लागली. आग लागल्याने रुग्णालयातील कर्मचारी आणि उपचार घेण्यासाठी आलेले रुग्ण यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्त्री रोग विभागाच्या शस्त्रक्रिया विभागामध्ये ही दुर्घटना घडली आहे. आग लागल्यानंतर अग्निशमन दलाला तातडीने बोलवण्यात आले. थोड्याच वेळात अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

कमीत-कमी खर्चात वैद्यकीय सेवा मिळाव्यात यासाठी गरीब व मध्यमवर्गीय घरातील रुग्ण शासकीय रुग्णालयात येतात. शॉक सर्किटमुळे आग लागण्याच्या घटना शासकीय रुग्णालयातच का घडतात ? अशा घटनेत कोणतीही जीवित हानी झाली तर त्याची जबाबदारी कोण घेणार ? असे असंख्य प्रश्न सामान्य नागरिकांच्या मनात येत आहेत.

Translate »
X