नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
कल्याण /प्रतिनिधी – महिलांना अनेकदा सांगुनही त्या सोन्याचे आभूषण परिधान करून गर्दीच्या ठिकाणी प्रवास करतात. अशाच महिलांच्या मागावर चैन स्नेचर असतात. कल्याण पूर्वेत पुन्हा चैन स्नेचिंगची घटना घडली आहे. हलाकीच्या आर्थिक परिस्थितीने कल्याणातील २ युवकांना चैन स्नेचिंग (Chain snatching) करण्यास भाग पाडले. कोळसेवाडी पोलिसांनी महिलेची चैन लंपास करणाऱ्या या दोघांना अटक केली आहे. काही तासातच पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेराच्या मदतीने आरोपींचा शोध लावला.
कल्याण (Kalyan) पूर्वेतील चिंचपाडा रोड परिसरात सविता सावंत या रस्त्यावर चालत असताना दुचाकी स्वार त्यांच्या जवळ आले. दुचाकीवर असलेल्या एकाने महिलेच्या गळ्यातील चैन हिसकावून घेतली. चैन खेचताच सविता सावंत खाली पडल्या. त्या उठेपर्यंत चोरटे पसार झाले. त्यांनी त्वरीत या बाबत कोळसेवाडी पोलिसांना माहिती देदिली. कल्याणचे डीसीपी सचिन गुंजाळ आणि कोळसेवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक कदम यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु करण्यात आला. परिसरात लागलेल्या सीसीटीव्हीमुळे चोरटे कोणत्या दिशेने पळून गेले आहे, याची माहिती पोलिसांना मिळाली. या दरम्यान कल्याण पूर्वेतून चोरटे कल्याण पश्चिमेत आले. पश्चिमेत आल्यावर हे दोघे शहाडच्या दिशेने निघून गेल्याचे सीसीटीव्हीत दिसले. शहाड येथून दोघे आंबिवलीच्या दिशेने निघून गेल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले होते. पोलिस आंबिवली येथे पोहचले. तेव्हा त्या ठिकाणच्या सीसीटीव्हीत हे चोरटे कैद होते. सीसीटीव्ही (Cctv) लागलेल्या काही अंतरावर एका घरात हे दोघे होते. पोलिसांनी या घरावर छापा टाकला. या छाप्यात पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकल्या. चेतन वाघ आणि फैजान अन्सारी अशी या चोरट्यांची नावे आहेत. दोन्ही आरोपी बेरोजगार आहेत. त्यांना पैशाची गरज असल्यामुळे त्यांनी लूटीचा मार्ग पत्करला असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांनी दिली आहे. यापूर्वीही अशा काही घटना त्यांनी केल्या आहेत का याचा तपास पोलिस करत आहेत.