महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
लोकप्रिय बातम्या शिक्षण

बार्टीमार्फत ‘संघ लोकसेवा आयोग – नागरी सेवा व्यक्तिमत्त्व चाचणी २०२१’ साठी पात्र उमेदवारांना आर्थिक सहाय्य व ऑनलाईन प्रशिक्षण

नेशन न्यूज मराठी टीम.

मुंबई – बार्टी संस्थेमार्फत संघ लोकसेवा आयोग- नागरी सेवा व्यक्तिमत्व चाचणी 2021 साठी पात्र उमेदवारांना आर्थिक सहाय्य व ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येणार आहे.बार्टी संस्थेने यु.पी.एस.सी. नागरी सेवा परीक्षा 2020 च्या व्यक्तिमत्व चाचणी परीक्षेच्या तयारीकरिता ऑनलाईन पद्धतीने मार्गदर्शन दिले होते.

या उपक्रमामध्ये सहभागी 23 उमेदवारांपैकी 10 उमेदवारांना यु.पी.एस.सी. परीक्षेत यश प्राप्त झाले होते. गतवर्षीप्रमाणे व उमेदवारांच्या मागणीनुसार यावर्षीही सनदी अधिकारी व तज्ञ मार्गदर्शक यांचेद्वारे व्यक्तिमत्व चाचणी परीक्षेचे ऑनलाईन प्रशिक्षण आयोजित करण्यात येत आहे. तसेच बार्टीमार्फत संघ लोकसेवा आयोग- नागरी सेवा  व्यक्तिमत्व चाचणी 2021 साठी उमेदवारांना एकरकमी रक्कम रु. 25,000/- चे आर्थिक सहाय्य देण्यात येत आहे. त्याबाबत सविस्तर जाहिरात व ऑनलाईन अर्ज बार्टी संस्थेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. जास्तीत जास्त पात्र उमेदवारांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन बार्टी संस्थेमार्फत करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी http://barti.maharashtra.gov.in>NOTICE BOARD>Advertisement-BARTI-UPSC-Civil Services Personality Test 2021 Financial assistance Scheme या लिंकवर भेट द्यावी, असे आवाहन बार्टी मार्फत करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×