पुणे/प्रतिनिधी – राज्यात चित्रपटांची निर्मिती अधिक नियोजित पद्धतीने व्हावी आणि निर्मितीसाठी आवश्यक सहकार्य मिळणे शक्य व्हावे यासाठी लवकरच चित्रपटाला उद्योगाचा दर्जा देण्यात येईल असे प्रतिपादन राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी केले. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय येथे राज्य शासनाच्या महासंस्कृती आणि पुणे फिल्म फाउंडेशनतर्फे आयोजित १९ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला ‘पिफ’चे संचालक आणि दिग्दर्शक जब्बार पटेल, विश्वस्त मोहन आगाशे, उल्हास पवार, प्रा.समर नखाते, प्रकाश मकदुम, प्रा.सतीश आळेकर, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले आदी उपस्थित होते.
मंत्री देशमुख म्हणाले, चित्रपटांसाठी चांगल्या पायाभूत सुविधा देण्याचे शासनाचे प्रयत्न आहेत. मुंबई फिल्मसिटी येथे चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका आणि ओटीटी प्लॅटफॉर्मासाठी अधिकाधिक सुविधा देण्यात येत आहेत. या व्यतिरिक्त इतर ठिकाणी चित्रपट निर्मितीसाठी आवश्यक पायाभूत सुविधांची विकेंद्रीकरण करण्याची गरज आहे. पुण्यात चित्रपट निर्मितीसाठी आवश्यक वातावरण आणि कुशल मनुष्यबळ लक्षात घेता अशा ठिकाणी पायाभूत सुविधांची निर्मिती गरजेची आहे. पुणे चित्रपट महोत्सवात त्यासाठी आवश्यक चांगल्या कल्पना पुढे येतील.
गेल्या दोन दशकापासून हे आयोजन होत आहे. कोरोनाचे संकट असतानाही महोत्सवाचे चांगले आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र शासनाने चित्रपटांना नेहमीच प्रोत्साहन दिले आहे. मुंबई चित्रपटांची राजधानी आहे आणि पुण्यात चित्रपटांसाठी अनुकूल वातावरण आहे. चित्रपट महोत्सवाच्यानिमित्ताने जगातील चित्रपट सृष्टिशी निगडित व्यक्ती एकत्र घेतात, कल्पनांची देवाणघेवाण करतात. हा महोत्सव भविष्यात अधिक व्यापक स्वरूपात आयोजित व्हावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
कोरोनाच्या नव्या विषाणूच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी आवश्यक दक्षता घ्यावी असे आवाहन त्यांनी केले. पुढील वर्षी पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन ३ ते १० मार्च २०२२ या कालावधीत होईल अशी घोषणा त्यांनी यावेळी केली.
प्रास्ताविकात श्री.पटेल यांनी पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सहकार्याबद्दल राज्य शासनाला धन्यवाद दिले. राज्य शासनाने महोत्सवासाठी ४ कोटी रुपये देण्याचे मान्य केल्याने चांगले आयोजन शक्य झाल्याचे ते म्हणाले.
यावेळी मंत्री देशमुख यांच्या हस्ते चित्रपट महोत्सवातील विविध पुरस्कार प्रदान करण्यात आले. महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येणारा ‘संत तुकाराम’ उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपटासाठीचा पुरस्कार ‘पोरगं मजेत आहे’ या चित्रपटाला आणि आंतरराष्ट्रीय चित्रपटासाठी ‘प्रभात’ पुरस्कार ‘शुड द विंड ड्रॉप’ या चित्रपटाला प्रदान करण्यात आला. इतरही पुरस्काराचे वितरण यावेळी करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी संरक्षण दल प्रमुख जनरल बिपीन रावत यांच्यासह हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या लष्करी अधिकाऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
Related Posts
-
राज्यात कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर दहावीची परीक्षा रद्द
https://youtu.be/rdM7CNF72Bo
-
महापौर हा भाजपाचाच होणार -मंत्री रवींद्र चव्हाण
नेशन न्यूज मराठी टिम. कल्याण/प्रतिनिधी- २०१९ साली कल्याण डोंबिवली महापालिकेत…
-
मच्छिमारांना लवकरच मिळणार डिझेलवरील परतावा
मुंबई - डिझेल परताव्यासाठी सन २०२० – २१ या वर्षासाठी करण्यात…
-
राज्यात स्वच्छतेत अंबाजोगाई बस स्थानक प्रथम क्रमांकावर
नेशन न्यूज मराठी टीम. बीड / प्रतिनिधी - राज्यातील बस…
-
लोकसभेच्या चौथ्या टप्प्यात राज्यात २९८ उमेदवार रिंगणात
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या…
-
लवकरच कैद्यांना कारागृहातून फोनवर कुटुंबियांशी बोलता येणार
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे / प्रतिनिधी - कारागृहातील कैद्यांना…
-
राज्यात वॉन्टेड असणारी टोळी बीड पोलिसांच्या ताब्यात
नेशन न्यूज मराठी टिम. https://youtu.be/pIbYnKt4b-M बीड/प्रतिनिधी - राज्यात वॉन्टेड असणारा…
-
दिवा रेल्वे स्थानकाचा लवकरच होणार कायापालट
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण ग्रामीण/संघर्ष गांगुर्डे -दिवा रेल्वे स्थानकातील…
-
राज्यात होणार गुणसंवर्धित तांदळाचे वितरण
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई- ॲनिमिया आजाराचे समुळ उच्चाटन करण्यासाठी, केंद्र शासनाकडून…
-
केंद्रीय मंत्री नारायण राणे १८ नोव्हेंबरला डोंबिवलीत
डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - केंद्रीय मंत्री नारायण राणे उद्या म्हणजेच १८…
-
राज्यात खासगी पशुवैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यास परवानगी
मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाअंतर्गत राज्यात खासगी पशुवैद्यकीय…
-
केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या विरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. अहमदनगर/प्रतिनिधी - केंद्रीय मंत्री नारायण…
-
प्राध्यापक संघटच्या वतीने मंत्री उदय सामंत यांचा सत्कार
औरंगाबाद/प्रतिनिधी - प्राध्यापकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी शासन सकारात्मक असून सर्व…
-
राज्यात प्लास्टिकचा थर असलेल्या उत्पादनांवर बंदी
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई -प्लास्टिक लेपीत आणि प्लास्टिकचा थर…
-
अमरावतीमध्ये मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याविरोधात धनगर बांधव आक्रमक
नेशन न्यूज मराठी टीम. अमरावती / प्रतिनिधी - मंत्री राधाकृष्ण…
-
शासनाच्या निर्णयास भाविकांनी सहकार्य करावे- गृहमंत्री देशमुख
प्रतिनिधी. पंढरपूर - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने वारकरी साप्रंदायाची परंपरा अखंडीत…
-
कल्याणातील सिग्नल यंत्रणेवर लवकरच मराठीतूनही दिसणार सूचना
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण शहरातील काही मुख्य चौकात स्मार्ट सिटी योजनेंतर्गत…
-
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर तीन दिवस कल्याण लोकसभेच्या दौऱ्यावर
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - महाराष्ट्रात मोठ्या राजकीय घडामोडी…
-
साताऱ्यात मंत्री शंभूराज देसाईंच्या घरासमोर शेतकऱ्याने केला आत्मदहनाचा प्रयत्न
नेशन न्यूज मराठी टिम. सातारा/प्रतिनिधी - खराडेवाडी येथील जमीन सावकाराने बळकावून…
-
चंद्रकांत पाटील यांना मंत्री पदावरून बर्खास्त करा,वंचितची मागणी
नेशन न्यूज मराठी टीम. नागपूर/प्रतिनिधी - उच्च व तंत्र शिक्षण…
-
जालना जिल्हात झळकले कृषी मंत्री व पालकमंत्री हरवल्याचे बॅनर
नेशन न्यूज मराठी टीम. जालना/प्रतिनिधी - जालना जिल्ह्यासह मराठवाड्यात मागील…
-
पशुसंवर्धनविषयी केंद्राकडे मंत्री सुनील केदार यांच्या विविध मागण्या
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - जनावरांचा विम्याचा निधी,…
-
राज्यात सर्व खाद्यतेल व तेलबियांवरील साठवणुकीवर निर्बंध नाहीत
मुंबई/प्रतिनिधी - केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार जीवनावश्यक वस्तू अधिनियम अंतर्गत सर्व…
-
मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते पुस्तक आदान प्रदान सोहळ्याचे उद्घाटन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. डोंबिवली/प्रतिनिधी - डॉ. श्रीकांत शिंदे…
-
कल्याण डोंबिवलीमध्ये विकास हरवल्यासारखा दिसतोय -गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/7zNXrCfrVAc कल्याण - आगामी केडीएमसी निवडणुकीच्या…
-
केडीएमसी लवकरच सुरु करणार स्वतःची जलतपासणी प्रयोगशाळा
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - दूषित पाण्यामुळे आपल्याला…
-
मोहोळ येथे होणार लवकरच सुसज्ज कोविड केअर सेंटर
सोलापूर/प्रतिनिधी - वाढत्या कोरोनाला आळा घालण्यासाठी रुग्णाना योग्य उपचार मिळावे.त्यांच्या…
-
बनावट नकाशांबाबत दोषींवर कारवाई होणार - महसूल मंत्री बाळासाहेब थोरात
नेशन न्युज मराठी टीम. मुबंई- मुंबई उपनगर जिल्ह्यातील भूमी अभिलेख…
-
राज्यात १ डिसेंबर पासून पहिलीपासूनच्या शाळा सुरू होणार
मुंबई/प्रतिनिधी - कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर राज्यातील बंद असलेल्या शाळा टप्प्याटप्प्याने…
-
मंत्री छगन भुजबळांविरोधात पैठण-छत्रपती संभाजीनगर मार्गावर रास्ता रोको आंदोलन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. जालना/प्रतिनिधी - जालना जिल्ह्यातील अंबड…
-
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घेतली साठे कुटुंबियांची निवासस्थानी भेट
प्रतिनिधी. नागपूर - कोझिकोड येथील विमान दुर्घटनेत नागपूरचे सूपुत्र वैमानिक विंग…
-
एमपीएससी मार्फत साडेपंधरा हजार पदाची भरती लवकरच होणार
मुंबई/प्रतिनिधी - सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग आदी विभागांना…
-
ऑस्ट्रियाच्या शिष्टमंडळाने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घेतली भेट
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - ऑस्ट्रियाच्या भारतातील राजदूत…
-
राज्यात ३० मार्चपर्यंत जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीची विशेष मोहीम
मुंबई प्रतिनिधी- शैक्षणिक, सेवा, निवडणूक, इतर कारणांकरिता सन 2020-21 या…
-
लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा; सोमवारी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या…
-
राज्यात हवेतून ऑक्सिजन निर्मितीचे ३८ पीएसए प्रकल्प कार्यान्वित
मुंबई/प्रतिनिधी - ऑक्सिजनच्या तुटवड्यावर मात करण्यासाठी राज्य शासनामार्फत प्रयत्न केले आहेत.…
-
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जी-२० बैठकस्थळी प्रदर्शनाला भेट
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे/प्रतिनिधी - केंद्रीय सूक्ष्म, लघु व…
-
संरक्षण मंत्री यांच्या हस्ते मालदीवला जलद गस्ती नौका सुपूर्द
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - संरक्षण मंत्री राजनाथ…
-
राज्यात रविवार २८ मार्च पासून रात्रीची जमावबंदी
मुंबई प्रतिनिधी - राज्यात कोरोना रुग्णांची वाढलेली संख्या लक्षात घेता गर्दी…
-
आरोग्य मंत्री तानाजी सावंतांच्या प्रतिमेला गाजराचा हार घालून युवक काँग्रेसच आंदोलन
नेशन न्यूज़ मराठी टिम. सोलापूर/प्रतिनिधी - सोलापूर शहरातील १०० खाटांचे…
-
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे ग्रीन हायड्रोजनबद्दल जनजागृती करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - केंद्रीय रस्ते वाहतूक…
-
मोसंबी फळाचे उत्पादन वाढविण्यासाठी पंजाबमधील तंत्रज्ञान राज्यात राबविणार
मुंबई/प्रतिनिधी - राज्याचे रोजगार हमी योजना आणि फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे…
-
शैक्षणिक संस्थांनी कौशल्य प्रशिक्षणावर भर द्यावा- मंत्री चंद्रकांत पाटील
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - पुढील काळात कौशल्य विकास…
-
कल्याण डोंबिवलीतील वाहतूक कोंडीवर महत्वाची बैठक,लवकरच निघणार तोडगा
कल्याण प्रतिनिधी- कल्याण डोंबिवलीतील रिक्षा स्टँडबाबत अधिक तक्रारी आल्या असून…
-
१२ मार्च रोजी राष्ट्रीय लोकअदालत; राज्यात सर्व जिल्ह्यांत व तालुक्यात आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - विधी सेवा प्राधिकरण अधिनियम,…
-
लवकरच बैलगाडा शर्यती सुरु करण्यासाठी निघणार तोडगा
मुंबई/प्रतिनिधी - राज्याला बैलगाडा शर्यतीची प्राचीन सांस्कृतिक परंपरा लाभलेली आहे.…