डोंबिवली/प्रतिनिधी – मंगळवारी लोकार्पण झालेल्या कोपर पुलावर खड्डे पडण्यास सुरुवात झालीये.या पुलाची दुपारच्या सुमारास मनसे आमदार राजू पाटील यांनी पाहणी केली .यावेळी आमदार पाटील यांनी अधिकाऱ्याशी चर्चा केली . त्यानंतर पत्रकारांशी बोलताना लोकार्पणानंतर 48 तासात पुलावर खड्डे पडण्याची ही पहिलीच घटना असेल ,हा पूल गणेशउत्सवा पूर्वी सुरू करण्याची मागणी केली जात होती आमची देखील ही मागणी होती त्यामुळे हा पूल खुला केला हे मान्य ,त्यानुसार पूल सुरू केला ,पुलावरील एक कोटच काम शिल्लक असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं मात्र हे काम पावसाने उसंत घेतल्यानंतर करायचं होतं मात्र ते केलं नाही ,या खड्ड्याची माहिती मिळताच पालिकेने ज्या तत्पररेने हा खड्डा बुजवला तीच तत्परता शहरातील खड्डयाबाबत दाखवावी असा टोला आमदार राजू पाटील यांनी लगावला.
Related Posts
युद्ध बंदीची बातमी पहिल्यांदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांकडून का ऐकायला मिळाली ? ॲड. प्रकाश आंबेडकर