Desk Marathi News

महत्वाच्या बातम्या

बनावट कागदपत्रांच्या आधारे चोरीच्या वाहनांची विक्री,९ जन गजाआड दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत
चर्चेची बातमी ठाणे

वाडा येथील मीटर रीडिंग एजन्सीविरुद्ध गुन्हा दाखल

नेशन न्यूज मराठी टीम.

वाडा – नेमून दिलेल्या कामात हलगर्जीपणा, डिसेंबर महिन्यात ९ हजार ३३१ ग्राहकांच्या मीटरचे प्रत्यक्ष रीडिंग न करता महावितरणची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी वाडा उपविभागातील मीटर रीडिंग एजन्सीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाडा पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला असून मे. कृपासिंधू इलेक्ट्रिकल कॉन्ट्रक्टर या एजन्सीचे चालक श्रीकांत प्रकाश बुलकाडे (राहणार सुंदरखेड, खामगाव रोड, बुलढाणा) याच्याविरूद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

महावितरणच्या वाडा उपविभागातील वीज ग्राहकांच्या मीटरचे रीडिंग व वीजबिल वाटपासाठी मे. कृपासिंधू इलेक्ट्रिकल कॉन्ट्रक्टर या एजन्सीची १४ जून ते ३१ डिसेंबर २०२१ या कालावधीसाठी नियुक्ती करण्यात आली होती. एजन्सीने डिसेंबर महिन्यात बनावट मीटर रिडर ओळखपत्र बनवून ९ हजार ३३१ ग्राहकांच्या मीटरचे प्रत्यक्ष रीडिंग घेतले नसल्याचे आढळले. महावितरणकडून या एजन्सीला मीटर रीडिंगसाठी प्रतिग्राहक सहा रुपयांचा मोबदला देण्यात येतो. त्यानुसार मीटर रीडिंग न घेता एजन्सीने महावितरणची ५५ हजार ९८६ रुपयांची फसवणूक केली. तसेच तर एका ग्राहकाचे मीटर रीडिंग न घेतल्याने सुमारे १८ लाख ८२ हजार ९१० रुपयांचा महसूल खोळंबल्याचे व नेमून दिलेल्या कामात एजन्सीने हलगर्जीपणा केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. वाडा उपविभागाचे सहायक लेखापाल (प्र) सुशील पाचारणे यांच्या फिर्यादीवरून मे. कृपासिंधू इलेक्ट्रिकल कॉन्ट्रक्टर एजन्सीचे चालक श्रीकांत बुलकाडे विरूद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ४२० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कल्याण परिमंडलात कार्यरत मीटर रीडिंग एजन्सींच्या कामाची पडताळणी करण्यात येत आहे. यात चुकीच्या नोंदी किंवा अन्य गैरप्रकारांमुळे महसुलाचे नुकसान आढळल्यास संबंधित एजन्सीविरुद्ध अशीच कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे महावितरणने कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
X