Desk Marathi News

महत्वाच्या बातम्या

बनावट कागदपत्रांच्या आधारे चोरीच्या वाहनांची विक्री,९ जन गजाआड दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत
इतर मुख्य बातम्या

उल्हासनगर मध्ये वीज मीटर रीडिंग एजन्सीविरुद्ध गुन्हा दाखल

उल्हासनगर/प्रतिनिधी – मीटर रिडींग एजन्सीने ग्राहकांच्या वीज वापराची कमी नोंद दाखवून महावितरणचे तीन लाख 92 हजारांचे नुकसान केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. उल्हासनगर एक विभागात करार पद्धतीने कार्यरत शिवशक्ती संगणक कुशल सहकारी संस्था ही मीटर रीडिंग एजन्सी, एजन्सीचा कामगार सचिन मारुती चौधरी (शिव हरे कृष्णा अपार्टमेंट, शिव गंगानगर, बालाजी मंदिराजवळ, अंबरनाथ पश्चिम) आणि त्याच्या सहकाऱ्यांनी ही लबाडी केली. त्यांच्याविरुद्ध उल्हासनगरच्या मध्यवर्ती पोलीस ठाण्यात विविध 11 कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे.

महावितरणच्या उल्हासनगर एक उपविभागांतर्गत वीज ग्राहकांच्या मीटर रीडिंगचे काम शिवशक्ती संगणक कुशल संस्थेला निविदा प्रक्रियेतून करार पद्धतीने देण्यात आले आहे. मात्र या एजन्सीचे काम समाधानकारक नसल्याचे आढळून आले व ग्राहकांच्याही तशा तक्रारी आल्या. यावर उल्हासनगर तीन उपविभागात पीसी 06 वरील ग्राहकांचे सदर एजन्सीने सप्टेंबरमध्ये घेतलेल्या मीटर रीडिंगची नवीन एजन्सीकडून ऑक्टोबरमध्ये पडताळणी करण्यात आली. या पडताळणीत 16 ग्राहकांच्या मीटर रीडिंगमध्ये अविश्वसनीय अशी मोठी तफावत आढळली. वीज वापर अधिक असतानाही स्वयंचलित वीजबिल प्रणालीत या 16 ग्राहकांचा वीज वापर खूप कमी नोंदवून एजन्सीने महावितरणचे 3 लाख 92 हजार रुपयांचे नुकसान केल्याची गंभीर बाब उघड झाली. शिवशक्ती संगणक कुशल संस्था, संस्थेचा कर्मचारी सचिन चौधरी व त्याच्या सहकाऱ्यांनी संगनमताने आर्थिक लोभापोटी वीज ग्राहकांच्या मीटर रीडिंगमध्ये जाणीवपूर्वक फेरफार करून महावितरणच्या महसुलाचे नुकसान व कराराचा भंग केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार वित्त व लेखा विभागाचे उपव्यवस्थापक किशोर हरी जाधव यांनी फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून उल्हासनगर पोलिसांनी आरोपींविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम 403, 405, 406, 408, 415, 418, 420, 463, 464, 468 आणि फौजदारी दंड प्रक्रिया संहितेच्या कलम 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास सहायक उपनिरीक्षक सुरेश लोटे करत आहेत.

कल्याण परिमंडलात कार्यरत मीटर रीडिंग एजन्सींच्या कामाची पडताळणी करण्यात येत आहे. यात चुकीच्या नोंदी किंवा अन्य गैरप्रकारांमुळे महसुलाचे नुकसान आढळल्यास संबंधित एजन्सीविरुद्ध अशीच कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे महावितरणने कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
X