नेशन न्यूज मराठी टिम.
नवी मुंबई/प्रतिनिधी– काल झालेली घटना ही दुर्दैवी उष्मघातामुळे अनेक लोकमृत्यू मुखी पडले, जखमी झाले. या आधी सुध्दा गेट आँफ इंडिया येथे महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला होता. महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक खात्याची जबाबदारी होती ती त्यांनी योग्य रित्या पार पाडायला हवी होती. पण त्यांनी ती योग्य रित्या पार पाडली नाही संबंधित खात्याच्या अधिकारी,सचिवावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा.अशी तिखट प्रतिक्रिया विरोधी पक्ष नेते आंबादास दानवे यांनी माध्यमांना दिली
सांस्कृतिक खात्याच्या आयोजकावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे.महाराष्ट्र भूषण पुरस्कार कार्यक्रमाची जबाबदारी सरकारची होती. मृत्यूची संख्या जास्त आहे, परंतु सरकार आकडा लपवण्याचा प्रयत्न करत आहे. स्वत: च्या निवाऱ्यासाठी तुम्ही निवारा केलात, पण जनतेच्या निवाऱ्यासाठी तुम्ही काही केलात नाही. अमित शहा यांचा संबंध काय येतो, अमित शहा हे महाराष्ट्र द्रोही आहेत. आणि त्याच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात येतो. आपल्या राज्यपालांच्या हस्ते किंवा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला पाहिजे होता. असेही विरोधी पक्ष नेते आंबादास दानवे म्हणाले.