Desk Marathi News

महत्वाच्या बातम्या

बनावट कागदपत्रांच्या आधारे चोरीच्या वाहनांची विक्री,९ जन गजाआड दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत
राजकीय

भाजप पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा; काँग्रेस कार्यकर्त्यांची मागणी

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. |

कल्याण/प्रतिनिधी – भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या विरोधात कारवाई न झाल्यास आम्ही पंतप्रधान आणि गृहमंत्री यांच्या फोटोला जोडे मारणार, असा इशारा कल्याण काँग्रेसच्या वतीने पोलिसांना देण्यात आले आहे. काँग्रेसच्या शिष्टमंडळाने कल्याण काँग्रेस अध्यक्ष सचिन पोटे, जिल्हा उपाध्यक्ष विनोद तिवारी, महिला काँग्रेस अध्यक्ष कांचन कुलकर्णी यांच्या नेतृत्वात कोळशेवाडी पोलिसांना निवेदन देखील देण्यात आले आहे.

टीएमसी खासदार कल्याण बॅनर्जी यांनी उपराष्ट्रपती यांची मिमिक्री केली होती आणि त्यादरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी व्हिडिओ काढला. या घटनेनंतर राज्यभरात भाजप कल्याण बॅनर्जी आणि राहुल गांधी विरोधात आक्रमक झाली होती. गुरुवारी संध्याकाळी कल्याण पूर्वेत भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी कल्याण बॅनर्जी आणि राहुल गांधी यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करत, घटनेच्या निषेध केला.

या आंदोलनानंतर आता कल्याण काँग्रेस आक्रमक झाली आहे. कल्याण काँग्रेसचे अध्यक्ष सचिन पोटे, उपाध्यक्ष विनोद तिवारी, महिला अध्यक्ष कांचन कुलकर्णी यांच्या नेतृत्वात काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी कोळसेवाडी पोलीस स्टेशनला जाऊन पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतली. काँग्रेस येथे राहुल गांधी यांच्या फोटोला जोडेमारो आंदोलन करण्यात आले, हे अतिशय चुकीचे आहे. जोडेमारो आंदोलन करणाऱ्या भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला पाहिजे. पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही, तर काँग्रेस पक्षाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या फोटोला देखील आम्ही जोडे मारणार असा कल्याण काँग्रेस जिल्हा अध्यक्ष सचिन पोटे यांनी इशारा दिला आहे.

याबाबत काँग्रेस महिला अध्यक्ष कांचन कुलकर्णी यांनी सांगितले की, काल भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी आणि त्यांचे जिल्हाध्यक्षांनी जोडेमारो आंदोलन केलं. केले कोणी दुसऱ्यांनी आणि यांनी सॉफ्ट टार्गेट राहुल गांधी यांना केलं. यांची जी कृती आहे, रोजचं रोज सुरू आहे. कोणी काही केला तर राहुल गांधीजींना आरोप करायचे आणि नको तसे आंदोलन करायचे, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याबाबत आम्ही आज कोळशेवाडी पोलीस स्टेशन येथे निवेदन देऊन मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
X